रशियाकडून मिळणा-या 'S-400' सिस्टीममुळे अमेरिकेची रडारला न सापडणारी विमाने पाडणेही शक्य

By admin | Published: October 15, 2016 05:12 PM2016-10-15T17:12:06+5:302016-10-15T17:18:52+5:30

सर्वात महत्वाचा करार आहे S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे.

It is also possible to put US radar not found in Russia due to the 'S-400' system. | रशियाकडून मिळणा-या 'S-400' सिस्टीममुळे अमेरिकेची रडारला न सापडणारी विमाने पाडणेही शक्य

रशियाकडून मिळणा-या 'S-400' सिस्टीममुळे अमेरिकेची रडारला न सापडणारी विमाने पाडणेही शक्य

Next

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. १५ - ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये शनिवारी झालेल्या व्दिपक्षीय चर्चेमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित १६ महत्वपूर्ण करार झाले. या करारांमध्ये सर्वात महत्वाचा करार आहे S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. 
 
अलीकडच्या काळातील भारताचा हा सर्वात महागडा करार असून, ३९ हजार कोटी रुपयांच्या या करारामुळे भारताचे हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित होणार आहे. शत्रू देशांची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांना आपल्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट करण्याचे हे तंत्रज्ञान आहे. S-400 हे S-300 ची पुढची आवृत्ती आहे. रशियन लष्करामध्ये २००७ पासून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टमचा वापर सुरु आहे. 
 
आणखी वाचा 
 
रशियाकडे एस-५०० असल्यामुळे ते एस-४०० तंत्रज्ञान विकत आहेत. एस-४०० मध्ये तीन वेगवेगळया पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून, या तंत्रज्ञानामुळे ४०० किलोमीटर क्षेत्रातील शत्रूचा हवाई हल्ला परतवून लावता येऊ शकतो. पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी असताना भारताला हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान कमालीचे उपयोगी पडणार आहे. भारताप्रमाणे चीनलाही रशिया एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम देणार आहे. 
 
पश्चिमेला पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळ तीन एस-४०० सिस्टम आणि पूर्वेला चीनजवळ दोन सिस्टम तैनात करण्याचा भारताचा विचार आहे. अमेरिकेची सर्वात अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाची एफ-३५, एफ-२२ ही लढाऊ विमाने एस-४०० क्षेपणास्त्र पाडू शकते असा रशियन तज्ञांचा दावा आहे. एफ-३५, एफ-२२ रडारला सापडत नाहीत. शक्तीशाली रडार हे एस-४०० सिस्टमचे वैशिष्टय आहे. 

Web Title: It is also possible to put US radar not found in Russia due to the 'S-400' system.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.