राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 09:34 PM2018-09-01T21:34:57+5:302018-09-01T21:37:36+5:30
कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
पणजी - कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने जरी खनिज कायदे दुरुस्त करणारा वटहुकूम जारी केला तरी, हरित लवादाच्या नव्या आदेशांनुसार 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम भागात येतात व त्यामुळे तिथे खाणी सुरू करता येणार नाहीत.
कस्तुरीरंगन अहवालाचे निष्कर्ष गोवा सरकारने यापूर्वी दाबून ठेवले होते. 99 ऐवजी 19 गावेच गोव्यात पर्यावरणीय संवेदनक्षम आहेत अशी भूमिका गोवा सरकारने घेतली होती. मात्र केरळमधील पुरानंतर देशभरातच जी स्थिती निर्माण झालेली आहे व राष्ट्रीय हरित लवादानेही नुकताच जो निवाडा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर कस्तुरीरंगन अहवालात कोणताच बदल करता येणार नाही. त्या अहवालानुसार 99 गावे इकोलॉजीकली सेनसीटीव क्षेत्रमध्ये येतात.
सांगे तालुक्यात एकूण 37 महसुली गावे आहेत, त्यापैकी 25 गावे पर्यावरणीय संवेदनक्षम (ईआयए) क्षेत्रत येतात, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. म्हणजेच सांगे तालुक्याचा एक तृतीयांश भाग हा पर्यावरणीय संवेदनक्ष आहे. तिथे खनिज खाणी सुरू करता येत नाहीत. धारबांदोडा तालुक्यातील सोळा पैकी बारा गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. अशा गावांमध्ये खाणी सुरू करणोच नव्हे तर वखारी देखील चालविता येत नाहीत. झाडे कापता येत नाहीत.
गोव्यात 1 हजार 424.46 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन क्षेत्र आहे. 200 चौरस किलोमीटर खासगी वन क्षेत्र आहे. फक्त 61.52 टक्के जमीन ही बिगर वनक्षेत्र ठरते. एकूण 755 चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे 20 टक्के गोवा हा वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रत येतो. कस्तुरीरंगन अहवालानुसार 1461 चौरस किलोमीटरचे गोव्याच क्षेत्र हे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र ठरते. गोव्याचे क्षेत्रफळ एकूण 3 हजार 702 चौरस किलोमीटरचे असून यापैकी 1 हजार 25क् चौरस किलोमीटर क्षेत्र हे संरक्षित, राखीव व खासगी वन क्षेत्रत येते. तिथे काहीच करता येत नाही हे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. राज्याची 4क् टक्के जागा ही कृषी क्षेत्रत येते. फक्त 5.32 टक्के म्हणजे 196.8क् चौरस किलोमीटर जागा ही कोणत्याच अडथळ्य़ांवीना आहे. म्हणजे ही जागा सीआरङोडमध्ये येत नाही किंवा नदीचे प्रवाहही तिथे नाहीत.
सत्तरी तालुक्यातील 56 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. या गावांमध्ये अंजुणो, गुळ्ळे, डोंगरवाडा-पणसुली, करंजोळ, देरोडे, पेंड्राल, साट्रे, वायंगिणी, शेळपे-बुद्रुक, कडवळ, शिंगणो या गावांमधील 10 टक्के भाग हा पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतो, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे.