बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात
By वासुदेव.पागी | Published: June 8, 2024 03:50 PM2024-06-08T15:50:11+5:302024-06-08T15:53:42+5:30
...बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता.
पणजी: पणजी महापालिकेच्या बाजार संकुलात बाजारकरांना शिस्त लावण्यासाठी रात्री बाजारात जाणे नगरसेवकाला महागात पडले. बाजारकरांनी त्याला मारहाण केली. पणजी महापालिकेचे एक नगरसेवक बन्सी उर्फ संतोष सुर्लीकर यांना पालिका बाजार संकुलाच्या काही बाजारकरांनी मारहाण केल्याची तक्रार पण पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे. सुरलीकर हे पणजी महापालिकेच्या बाजार समितीचे एक सदस्य आहेत. बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बन्सी त्या ठिकाणी गेले होते आणि अतिक्रमण विषयी ते बोलत होते. परंतु लोकांनी आपले काहीच ऐकून घेतले नाही आणि काही ने आपल्या शर्टला पकडले असेही बन्सी यांचे म्हणणे आहे. मात्र तेथील बाजारकरांचे याबाबतीत विसंगत सूर निघाले आहेत. बन्सी हे पालिका बाजार समितीचे घटक असल्यामुळे ते याचा गैरफायदा उचलतात असा दावा त्यांनी केला. दरम्यान बन्सीवर हल्ला करणाऱ्या एकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार बाजार समितीची माणसे या बाजारात रात्रीच येतात.
सरकारही रात्रीच्या वेळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेले होते. तिथे बाजारकरांचे आणि बन्सी यांची शाब्दिक चकमक झाली. एका बाजारकराने बन्सी यांचा शर्ट ओढला त्यामुळे तो पिंजला गेला. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे