...तो निर्णय पक्षाचा नव्हे!: दीपक ढवळीकर, आमदार जीत आरोलकर यांच्याबाबत प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 03:51 PM2023-10-03T15:51:54+5:302023-10-03T15:53:24+5:30
पेडणे तालुक्यातील जमिनींच्या झोनबदलाचा आराखडा करताना पंचायती नागरिक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, असे आमदार जीत आरोलकर यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मगोपने राज्यात सरकारला पाच वर्षांसाठी पाठिंबा दिलेला आहे. केंद्रातही आपला पक्ष एनडीएसोबत आहे. त्यामुळे आहे.' सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी झोनिंगप्रश्नी सरकारमधून बाहेर पडण्याचा जो इशारा दिला आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नव्हे, असे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, नगर नियोजनमंत्री म्हणून विश्वजित राणे यांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत. यापूर्वी खात्याच्या कुठल्याही मंत्र्याने असे निर्णय घेतले नव्हते. ५०० चौरस मीटर क्षेत्रापर्यंत घर बांधण्यासाठी सोपस्कार सुटसुटीत करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. ढवळीकर म्हणाले की, 'पेडणे तालुक्यात झोनिंगबद्दल किंवा अन्य काही समस्या असल्यास मंत्री विश्वजित मगोप नेतृत्त्वाला सोबत घेऊन चर्चा विनिमयाने तोडगा काढू शकतात. '
दरम्यान, पेडणे तालुक्यातील जमिनींच्या झोनबदलाचा आराखडा करताना पंचायती नागरिक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही, असे आमदार जीत आरोलकर यांचे म्हणणे आहे.