...तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही : टी. राजासिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:20 AM2023-06-24T09:20:31+5:302023-06-24T09:22:31+5:30

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारताला हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही.

it will not take long for India to become a hindu nation said t raja singh in goa | ...तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही : टी. राजासिंह

...तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही : टी. राजासिंह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : देश आणि धर्म यांसाठी आम्ही मरायलाही सिद्ध आहोत. हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे राज्यकर्ते धर्मांधांचे लांगुलचालन करत आहे. गोरक्षण करणाऱ्या हिंदूवर गुन्हे नोंदवले जातात. बंगालप्रमाणे तेलंगाणामध्येही हिंदूवर अत्याचार चालू आहेत, असे प्रतिपादन 'तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले.

ते 'वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा'त 'तेलंगणा येथील हिंदुद्रोही सरकारची दडपशाही, तसेच हिंदु राष्ट्राचा संघर्ष या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले 'मला हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूनी निवडून दिले आहे. अनेक राज्यांत हिंदूंच्या हत्या होत असून येणाऱ्या संकटांविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. स्वतःच्या रक्षणासाठी हिंदू युवक आणि युवती यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच हिंदू स्वतःचे आणि धर्माचे रक्षण करू शकतील. असेही ते म्हणाले.

सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्यास भारताला हिंदु राष्ट्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदू राष्ट्रासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा, अशीही भूमिका त्यांनी मांडली. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना'चे अध्यक्ष कमलेश कटारिया यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी अमरावती येथील श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या हस्ते डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण' (खंड १ ) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती' या 'ई-बुक'चे प्रकाशन करण्यात आले.

 

Web Title: it will not take long for India to become a hindu nation said t raja singh in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.