उद्यापासून पुन्हा जोरदार बरसणार पाऊस, येलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 05:00 PM2023-09-22T17:00:06+5:302023-09-22T17:00:24+5:30

दीड दोन महिने कोरडे गेल्यानंतर मान्सून गच्छंती जवळ आली असताना पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे. 

It will rain heavily again from tomorrow | उद्यापासून पुन्हा जोरदार बरसणार पाऊस, येलो अलर्ट जारी

उद्यापासून पुन्हा जोरदार बरसणार पाऊस, येलो अलर्ट जारी

googlenewsNext

पणजी: पावसाळा ऋतू संपण्यासाठी अवघा एक आठवडा राहिला असताना मान्सून आणखी सक्रीय बनला आहे. शनिवारपासून आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने वर्तविला आहे. दीड दोन महिने कोरडे गेल्यानंतर मान्सून गच्छंती जवळ आली असताना पुन्हा एकदा संततधार सुरू झाली आहे. 

शनिवारपासून पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणेश चतुर्थी प्रमाणेच पाच दिवसांची चतुर्थीच्या उत्साहावरही पाऊस विरजण टाकणार असल्याची चिन्हे आहेत. लोकांना मूर्ती विसर्जनेत पाऊस अडथळा आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मान्सूनने इंचाचे शतक पार केल्यानंतर ११८ इंच सरासरी पावसाचे लक्ष्यही पार केले आहे. एकूण सरासरी पाऊस १२० इंच इतका झाला आहे. 

सामान्य प्रमाणापेक्षा हा पाऊस ३.७ टक्क्यांनी अधिक आहे. आठ दिवसात पडलेला पाऊस हा एकूण सरासरी मान्सूनला तूटीकडून अतिरिक्त पावसाकडे घेऊन गेला. एकूण १३ पैकी नि्म्म्या अधिक भागात मान्सून ११८ इंचाहून अधिक पडला आहे. सर्वाधिक पाऊस केपे भागात १३५ इंच इतका तर सांगेत १३१ इंच इतका पडला आहे. फोंड्यात १२६ इंच तर वाळपईत १२४ इंच पाऊस आतापर्यंत नोंद झाला आहे.

...तर यंदा मान्सूनोत्तर पाऊसही
१ जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा काळ असा हवामान खात्याकडून नोंदला जातो.३० १ जून पूर्वी पडलेला पाऊस हा पूर्वमान्सून तर ३० सप्टेंबरनंतर पडलेला पाऊस हा मान्सुनोत्त पाऊस अशी नोंद ठेवली जाते. यंदा बंगाच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एकंदरच देशात वातावरणात बदल घडून आला आणि मान्सून सक्रीय झाला. याचा प्रभाव आणखी काही दिवस राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडणार, म्हणजेच गोव्याला यंदा मान्सूनोत्तर पाऊस मिळणार असे संकेत आहेत. मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यात पाण्याचा साठा वाढतो. त्यामुळे मे महिन्यात भेडसावणारी पाणी टंचाही होत नाही. २०२१ मध्ये गोव्यात मान्सुनोत्तर पाऊस पडला होता
 

Web Title: It will rain heavily again from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस