आयटीआय ऑनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:13 IST2024-05-27T15:12:04+5:302024-05-27T15:13:07+5:30
राज्यात महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज साेमवारपासून सुरु झाली आहे. तसेच आता आयटीआय प्रवेश सुरु झाला असून तो २७ मे ते ३० जून असे एक महिन्यासाठी खुला आहे.

आयटीआय ऑनलाईन प्रवेश ३० जूनपर्यंत खुला
नारायण गावस
पणजी: गोवा सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालनालयाच्या आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया २७ मे ते ३० जून पर्यंत खुली करण्यात आली आहे. ८ वी पास ते पदवीधारक आयटीआयसाठी प्रवेश करु शकतात. यासाठी आयटीआयचे ऑनलाईन प्रोस्पेक्टस २०२४ - २५ हे www.goaonline.gov.in या वेबसाईवर उपलब्ध आहेत. असे आवाहन कौशल्य विकास व उद्यमशीलता संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.
राज्यात महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज साेमवारपासून सुरु झाली आहे. तसेच आता आयटीआय प्रवेश सुरु झाला असून तो २७ मे ते ३० जून असे एक महिन्यासाठी खुला आहे. जागा रिक्त असल्या तर त्या ३१ ऑगस्ट पर्यंत भरल्या जातील असेही खात्याने कळविण्यात आले आहे. राज्यात सर्व सरकारी आयटीआयमध्ये हे प्रवेश अर्ज खुले केले आहेते. आयटीआयकडे अनेक काेर्स उपलब्ध आहे.
दहावी बारावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आता आयटीआय प्रवेश करत आहेत. आयटीआयमध्ये मेकॅनिक, प्लबंर, तसेच शिंपी अन्य विविध काेर्ससाठी विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. आता आयटीआयमध्ये अनेक नवीन काेर्सेस सुरु झाले आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून आयटीआयमध्ये प्रवेश संख्या वाढत आहे. महाविद्यालयापेक्षा अनेक विद्यार्थी संख्या आयटीआयमध्ये व्यावसायिक काेर्सात प्रवेश घेत आहेत.