जैका : सरकारला अहवाल सादर

By admin | Published: July 27, 2015 02:01 AM2015-07-27T02:01:44+5:302015-07-27T02:01:57+5:30

पणजी : जैका प्रकल्पात लुईस बर्जर कंपनीकडून घेतलेल्या कथित लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून गुन्हा अन्वेषण विभागाकडून (

JACKA: Presenting the report to the government | जैका : सरकारला अहवाल सादर

जैका : सरकारला अहवाल सादर

Next

पणजी : जैका प्रकल्पात लुईस बर्जर कंपनीकडून घेतलेल्या कथित लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) या प्रकरणात सरकारला चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. लाचखोरीच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष तपासातून निघाला आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी या प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना सादर केला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.
सीआयडीचा तपास अहवाल १० पानी असून त्यात जैकाचे प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर, अभियंते गुरुनाथ नाईक पर्रीकर व इतर अधिकाऱ्यांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या आहेत. जैकाच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या फायलींच्या आधारे हा चौकशी अहवाल बनविण्यात आला असून या प्रकरणात लाचखोरी होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा निष्कर्ष तपासातून काढण्यात आला असल्याची माहिती या सूत्रांकडून देण्यात आली. जैकाच्या गोव्यातील प्रकल्पात लुईस बर्जर इंटरनॅशनल (पान ६ वर)

Web Title: JACKA: Presenting the report to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.