कोलवाळ येथील कारागृह होणार स्वयंपूर्ण

By काशिराम म्हांबरे | Published: April 25, 2023 05:42 PM2023-04-25T17:42:51+5:302023-04-25T17:43:38+5:30

त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज मंगळवारी करण्यात आले.

jail at goa kolwal will be self sufficient | कोलवाळ येथील कारागृह होणार स्वयंपूर्ण

कोलवाळ येथील कारागृह होणार स्वयंपूर्ण

googlenewsNext

काशीराम म्हाबरे, म्हापसा: कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातील कैद्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने, त्यांना आर्थिक मिळकत मिळावी तसेच कैद्याच्या वागणुकीत सुधारणा व्हावी या दृष्टीने कारागृहाच्या प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज मंगळवारी करण्यात आले.

यावेळी कारागृहाचे महानिरीक्षक ओमविर सिंग बिश्नोय, सहाय्यक महानिरीक्षक वासुदेव शेटये तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. कारागृहाला लागणाºया दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी कारागृहाच्या आवारात गोशाळा सुरु करण्यात आली आहे. तसेच गोशाळेतून मिळणाºया शेणातून गोबर गॅस सुरु केले जाणार आहे.

कारागृहातील ज्या कै द्यांजवळ आधार कार्ड नव्हते  अशा कैद्यांचे आधार कार्ड करण्यासाठीची सेवा सुरु करण्यात आली आहे.  महिला कैद्यांसाठी सेनीटरी पॅड तयार करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी  कारागृहात मशीन बसवण्यात आले आहे. तयार होणाºया अतिरिक्त पॅडची विक्री केली जाणार आहे. कारागृहातील कै दी स्वावलंबी व्हावे यासाठी कैद्यांसाठी हस्तकला केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यात वेगवेगळ््या प्रकारची हस्तकला तयार केली जाणार आहे. त्या तयार करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण कैद्यांना दिले जाणार आहे.

रोटी तयार करण्याच्या मशीनचा वापर कारागृहात सुरू करण्यात आला आहे. कारागृहात कैद्यांना लागणाºया सर्व रोटी या मशीनव्दारे तयार केली जाणार आहे. तसेच कैद्यांसाठी योगाकेंद्र,  अभ्यासाचे केंद्र सुरु केले जाणार आहे.  कै द्यात सुधारणा व्हावी. त्यांना आर्थिक पाठबळ प्राप्त व्हावे या उद्येशाने या सुविधा उपलब्धकरण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कारागृहात घडणाºया गैर प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारागृहाचा ताबा पोलिसांकडे दिला आहे. गेल्या  ३ महिन्यापूर्वी कारागृहाचा ताबा आजीपी दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपवण्यात आला आहे. कारागृहातील प्रशासनाची हाताळणी त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे फार मोठेबदल घडवले जाणार आहे. शिस्त आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: jail at goa kolwal will be self sufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.