कारागृहातील जेलगार्डअंमली पदार्थासह ताब्यात
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 15, 2023 07:23 PM2023-03-15T19:23:54+5:302023-03-15T19:24:02+5:30
संशयित मोटे यांच्यावर या पूर्वी सुद्धा अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यात आली होती.
प्रसाद म्हांबरे
म्हापसा (गोवा): कोलवाळ येथील केंद्राय करागृहात तेथील जेल गार्ड समीर मोटेयाला गांजा तसेच तत्सम अमली पदार्थाच्या वस्तूसहित रंगेहाथ पकडण्यात आले. कारागृहात ड्युटीसाठी प्रवेश करण्याच्या तयारीत असताना कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली.
संशयित मोटे यांच्यावर या पूर्वी सुद्धा अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. कै द्यांना अमली पदार्थ तसेच मोबाईल फोनचा पुरवठा केल्याच्या कारणास्तव ही कारवाई झालेली. त्यानंतर त्याला निलंबीतही करण्यात आले होते. आज ( बुधवारी) करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल तेथील प्रशासनाकडून तयार करून पुढील कार्यवाहीसाठी कारागृहाच्या महानिरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. पाठवलेल्या अहवालानंतर चौकशी आरंभण्यात आली आहे.
गेल्या १५ दिवसात महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली कारागृहावर दोन वेळा छापे मारण्यात आले होते. या छाप्यात कारागृहातून 25 हून जास्त मोबाईल फोन, अमली पदार्थ तसेच तंबाखू जन्य पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तेथील साहाय्यक जेलरची बदलीही करण्यात आलेली.