आसगाव प्रकरण जस्पाल सिंगना भोवले: गोव्यातून उचलबांगडी,आलोक कुमार नवे डीजीपी
By पूजा प्रभूगावकर | Published: July 12, 2024 02:14 PM2024-07-12T14:14:01+5:302024-07-12T14:14:14+5:30
आयपीएस आलोक कुमार हे गोव्याचे नवे डीजीपी असतील. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी - गोवा
पणजी: आसगाव घर जमिनदोस्त प्रकरण अखेर गोव्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी ) जस्पाल सिंग यांना भोवले. जस्पाल सिंग यांची उचलबांडगी करुन दिल्लीत बदली केली आहे. आयपीएस आलोक कुमार हे गोव्याचे नवे डीजीपी असतील. याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केला आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी गोवा पोलिस महासंचालक (डीजीपी) जस्पाल सिंग यांनी आपल्यावर दबाव टाकला, अशी जबानी हणजूणच्या पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी चौकशी अहवालात नोंद केली होती. सदर अहवाल हा हणजूण मुख्य सचिवांना सादर केला होता. त्यांच्या या जबानीमुळे एकच खळबळ उडाली होती.
आगरवाडेकर कुटुंबियांचे घर मुंबई स्थिती महिला पूजा शर्मा हिच्या सांगण्यावरुन पाडले होते. घर पाडतानाची प्रक्रिया सुरु असताना हणजूण पोलिस तेथे उपस्थित होते. आगरवाडेकर कुटुंबियांनी त्याला विरोध करुनही घर पाडण्यात आले. या घटनेवरुन पोलिसांवरही आरोप झाला होता.