शिवनाथ संस्थानचा २६ रोजीपासून जत्रोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:03 PM2023-12-11T15:03:03+5:302023-12-11T15:03:19+5:30

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

jatrotsav of shivnath temple saunsthan shiroda goa from 26th december 2023 | शिवनाथ संस्थानचा २६ रोजीपासून जत्रोत्सव

शिवनाथ संस्थानचा २६ रोजीपासून जत्रोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : शिवनाथी-शिरोडा येथील ग्रामदैवत श्री शिवनाथ संस्थानातील वार्षिक जत्रोत्सव दि. २६ ते दि. ३१ या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

२६ रोजी सकाळी श्री शिवनाथ व पंचिष्ट देवतांना विधिपूर्वक अभिषेक पूजा व अन्य धार्मिक विधी व सकाळी गवळणकाला होईल. सकाळी ९ वाजता पालखीतून मिरवणूक, लघुरुद्र व अन्य धार्मिक विधी. दुपारी १ वाजता श्रींची महाआरती व महाप्रसाद सर्व भाविकांना दिला जाणार आहे. सायंकाळी ७ वा. श्री मंडलेश्वर देवाचे श्री शिवनाथ मंदिरात आगमन, मुक्तद्वार, पुराणवाचन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 

२७ रोजी पहाटे, ५:३० वा. सांगोड, नौकाविहार रथोत्सव, दुपारी १२ वा. दिवजोत्सव होईल. रात्री ८ वा. प्रसाद वाटप होईल. २८ रोजी रात्री ८:३० वा. श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे


 

Web Title: jatrotsav of shivnath temple saunsthan shiroda goa from 26th december 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा