'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:22 PM2023-12-21T13:22:30+5:302023-12-21T13:23:15+5:30

गोव्यात आतापर्यंत या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

jn 1 variant patients found in goa the report of 19 people came positive | 'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

'जेएन-१ व्हेरियंट'चे गोव्यात आढळले रुग्ण; १९ जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : देशात नव्याने आढळलेला कोविडचा जेएन व्हेरियन्ट गोव्यातही पोहोचला आहे. गोव्यात आतापर्यंत या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

गोव्यात कोविड चाचण्यांबरोबरच जीनोम सिक्वेन्सिंगही सुरू करण्यात आल्यामुळे कोविडची प्रकरणे वाढल्यानंतर पुन्हा एकदा जिनोम सिक्वेन्सिंगसाठीही सेम्पल्स पाठविणे सुरू केले होते. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील जिनोमिंग विभागाने आरोग्य संचालनालयाकडे पाठविलेल्या अहवालानुसार जेएन-१ चे १९ बाधित सापडले आहेत. यामुळे खळबळही माजली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करून लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. लोकांनी केवळ काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना आवश्यक सूचना केल्या असून, या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विशवजित राणे सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, त्यात त्यांनी बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांची माहती दिली. तूर्त कोणतीही मार्गदर्शिका केंद्राने जारी केली नसल्याचे राणे यांनी सांगितले; परंतु खबरदारी घेणे आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

काय आहे जेएन-१

जेएन-१ हा करोना विषाणूच्या बीए.२.८६ या उपप्रकाराचाच एक भाग असून, सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जेएन-१ चा संसर्ग आढळून आला होता. ज्या चीनमध्ये कोविड तयार होऊन जगभर पसरला तिथेच ही नवीन प्रजाती तयार झाल्याचेही शास्त्रज्ञांचे मत आहे. ओमायक्रॉन व्हेरियन्टपासून जो त्रास होतो त्याच प्रकारचा त्रास या व्हेरियंटपासून होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

 

Web Title: jn 1 variant patients found in goa the report of 19 people came positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.