विकास कामांसाठी सरकार निधी देण्यास अपयशी, जोसेफ सिक्वेरा यांची टीका

By काशिराम म्हांबरे | Published: January 16, 2024 03:46 PM2024-01-16T15:46:16+5:302024-01-16T15:46:30+5:30

कळंगुट  पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी सरकारवर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अपयश आल्याबद्दल टीका केली आहे. निधी ...

Joseph Sequeira criticizes government s failure to fund development works | विकास कामांसाठी सरकार निधी देण्यास अपयशी, जोसेफ सिक्वेरा यांची टीका

विकास कामांसाठी सरकार निधी देण्यास अपयशी, जोसेफ सिक्वेरा यांची टीका

कळंगुट  पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी सरकारवर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अपयश आल्याबद्दल टीका केली आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने पंचायतीला स्वखर्चाने विकास कामे हाती घेणे भाग पडत असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.

तसेच कळंगुट मतदार संघातील विद्यमान आमदार मायकल लोबो आणि आमदार विजय सरदेसाई यांना ओपिनीयन पोलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत उभारण्यात आलेल्या अपयशाबद्दलही टीका केली आहे. लोबो यांनी उपसभापती असताना तसेआश्वासन दिले होते तसेच दिलेल्या आश्वासनाचे सरदेसाई यांनी समर्थन केले होते. मात्र ४ वर्षानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप सिक्वेरा यांनी केला.

ओपिनियन पोल दिनानिमित्त कळंगुट येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसंगी जोझफ सिक्वेरा बोलत होते. मागील विधानसभेची निवडणूक सिक्वेरा यांनी ककळंगुट मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीवर लढवली होती. सिक्वेरा यांनी सरकार वरील टिकेतून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

विद्यमान आमदार लोबो यांनी चार वर्षांपूर्वी विधानसभेत पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानंतर ते सरकारात मंत्रीपदी सुद्धा आरुढ झाले होते.  मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात अद्यापही त्यांना अपयश आल्याची टीका सिक्वेरा यांनी यावेळी केली. विधानसभेत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय दयानंद बांदोडकर यांचा पुतळा विधानसभेत उभारण्यात आला आहे, मग जॅक सिक्वेरांचा पुतळा का नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना केला. फक्त आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करू नका. लोकांना कामही करून दाखवा असे आवाहन सिक्वेरा यांनी केले.  कळंगुट पंचायत क्षेत्रातील अनेक विकास प्रकल्पावर सरकारकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले.

Web Title: Joseph Sequeira criticizes government s failure to fund development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा