काब द राम येथील खून प्रकरण: मयत दिक्षाचे कुटुंबिय गोव्यात दाखल: सोमवारी होणार शवचिकित्सा
By सूरज.नाईकपवार | Published: January 21, 2024 05:06 PM2024-01-21T17:06:21+5:302024-01-21T17:06:33+5:30
बुडवून खून केलेल्या दिक्षा गंगवार (२७) हिचे कुटुंबिय आज रविवारी गोव्यात दाखल झाले आहे. तिचे वडील व अन्य नातेवाईक मिळून एकूण पाच जण गोव्यात आले आहे.
मडगाव: बुडवून खून केलेल्या दिक्षा गंगवार (२७) हिचे कुटुंबिय आज रविवारी गोव्यात दाखल झाले आहे. तिचे वडील व अन्य नातेवाईक मिळून एकूण पाच जण गोव्यात आले आहे. पोलिसांनी यातील काहीजणांची जबानीही नोंदवून घेतली. यात संशयित गौरव कटीयार हा आपली पत्नी दिक्षा हिला नांदवायला तयार नव्हता, त्याचे अन्य कुणाशी तरी विवाहबाहय संबध होते अशी माहिती उघड झाली आहे. उदया सोमवारी मयताच्या मृतदेहावर शवचिकित्सा हाेणार आहे.
खुनाचे हे प्रकरण अंत्यत गुंतागुतींचे असल्याने पोलिस तपासाबाबत कमालीची गुप्तता बाळगून आहेत. कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश हे पुढील तपास करीत आहेत. भादंसंच्या ३०२ कलामाखाली पोलिसांनी गौरव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करुन अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.
शुक्रवारी दुपारी राजबाग काब द राम येथील सुमद्रकिनारी गौरवने आपली पत्नी दिक्षा हिला पाण्यात बुडवून तिचा खून केला होता. नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेउन मागाहून रितसर अटक केली होती.