कदंबची क्यूआर सेवा बंद पडण्याच्या मार्गावर, प्रवाशांचा सेवेला अत्यल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 05:53 PM2023-08-16T17:53:35+5:302023-08-16T17:54:11+5:30
दीड वर्षापूर्वी क्यूआर कोड सेवा कदंबा महामंडळाने सुरू केली होती.
- नारायण गवस
पणजी : कदंब महामंडळाने बसची तिकिटे डिजिटलाइज केली होती. यासाठी महामंडळाने सर्व कदंबा बसस्थानक तसेच बसमध्ये क्यूआर कोड बसविले होते. पण ग्राहकांचा याला अल्प प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे कदंबाने सुरुवात केलेला हा उपक्रम सध्या बंद पडण्याचा मार्गावर आहे. दीड वर्षापूर्वी क्यूआर कोड सेवा कदंबा महामंडळाने सुरू केली होती.
कंडक्टरकडून होणारी फसवणूक तसेच लोकांचा वेळ तसेच गर्दीत कंटक्टरला सर्वांची तिकिटे काढण्यासाठी जावे लागत नव्हते. क्यूआर कोडवर स्कॅन करून तिकीट काढता येत होते. तसेच घरी बसून तसेच बसस्थानकावरून बसची तिकिटे काढणे शक्य होते पण काही मोजक्या लोकांनी याचा वापर केला त्यामुळे आता ही सेवा बंद पडण्याचा मार्गावर आहे.
कदंबामधून प्रवास करणारे प्रवासी हे बहुतेक पासधारक आहे. तसेच, काही वयस्क प्रवासी आहेत. त्यांना क्यूआर कळत नाही तसेच अनेक प्रवासी हे कधीकाळी कदंबाने प्रवास करत असतात. अशा विविध कारणांमुळे प्रवासी क्यूआरचा वापर करत नाही. तरीही डिजिटलाइज करण्यासाठी ही सेवा सुरू होती. पण त्याला हवे तसे अश मिळाले नाही.
सध्या कदंबा महामंडळ प्रवासी वाढविण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगल्या सोयी या देण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. पण तरी महामंडळ ताेट्यात येत आते. आता माझी बस योजना सुरू केली असून यातही महामंडळाला नुकसान सहन करावे लागत आहे. प्रवासी पासपद्धत लागू करून महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसान सहन करूनही आम्ही प्रवाशांना चांगली सुविधा देते असतो, असे कदंबाच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.