कला अकादमी ३६५ दिवस कलाकारांसाठी खुला: डिसेंबर पासून कार्यक्रमांचे बुकिंग घेणार: मुख्यमंत्री

By पूजा प्रभूगावकर | Published: November 10, 2023 01:39 PM2023-11-10T13:39:18+5:302023-11-10T13:39:28+5:30

वास्तून ही तेव्हाच जीवंत होते, जेव्हा कलाकार आपली कला त्यात सादर करतात.

Kala Academy open for artistes 365 days: Will take bookings for programs from December: Chief Minister | कला अकादमी ३६५ दिवस कलाकारांसाठी खुला: डिसेंबर पासून कार्यक्रमांचे बुकिंग घेणार: मुख्यमंत्री

कला अकादमी ३६५ दिवस कलाकारांसाठी खुला: डिसेंबर पासून कार्यक्रमांचे बुकिंग घेणार: मुख्यमंत्री

पणजी: कला अकादमी आता ३६५ दिवसही कलाकारांसाठी खुले असेल. नाटक, तियात्र तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे बुकिंग कला अकादमीत डिसेंबर पासून सुरु होईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुतनीकरण केलेल्या अकादमीच्या उद्घाटनावेळी जाहीर केले.

वास्तून ही तेव्हाच जीवंत होते, जेव्हा कलाकार आपली कला त्यात सादर करतात. त्यामुळे पुढील महिन्यांपासून कला अकादमीत पुन्हा एकदा कार्यक्रम सादर होती. कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने अडीच वर्ष येथे कुठलेली कार्यक्रम झाले नाही. त्यामुळे कलाकारांसाठी आपल्याला थोडे वाईट वाटले. मात्र आता ती पुन्हा खुली झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील नव्हे तर गोव्याबाहंरील कलाकार सुध्दा कला अकादमी कधी सुरु होईल याची वाट पहात होते. कला अकादमीच्या वास्तुला ५० वर्ष पूर्ण झाल्याने त्याच्या नुतनीकरणाची गरज होते. पुढील ५० वर्षाच्या दृष्टीने हे नुतनीकरण झाले आहे. राज्यातील जुन्या वास्तु तसेच इमारतींचे सरकार नुतनीकरण करीत आहेत. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हे बरीच नाटके करतात. नाटकाचे अनेक प्रयोग त्यांनी आता पर्यंत केले आहेत. कला अकादमीचे उद्घाटन झाल्याने ते त्यांचे नाटक आता येथे सादर करतील. कलाकारांसाठी कला अकादमी ३६५ दिवसही सुरु असेल असे त्यांनी जाहीर केले.

Web Title: Kala Academy open for artistes 365 days: Will take bookings for programs from December: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.