कामाक्षी फॉरेक्सचा गंडा तब्बल ५५ कोटींचा

By admin | Published: June 22, 2016 10:44 PM2016-06-22T22:44:59+5:302016-06-22T22:44:59+5:30

कामाक्षी फॉरेक्स गंडा प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, फसवणुकीचा आकडा तब्बल ५५ कोटी ७0 लाख इतका आहे. अटकेत असलेल्या निलेश रायकर याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी

Kamakshi forex has a net worth of Rs 55 crores | कामाक्षी फॉरेक्सचा गंडा तब्बल ५५ कोटींचा

कामाक्षी फॉरेक्सचा गंडा तब्बल ५५ कोटींचा

Next

ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. २२ - कामाक्षी फॉरेक्स गंडा प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, फसवणुकीचा आकडा तब्बल ५५ कोटी ७0 लाख इतका आहे. अटकेत असलेल्या निलेश रायकर याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी विरोध करताना संशयिताने ८६0 जणांना गंडा घातला असून, जामीन मंजूर झाल्यास गुंतवणुकदाराच्या विश्वासाला तडा जाईल अशी भिती व्यक्त केली आहे. दरम्यान रायकर याच्या जामीन अर्जाला त्याच्याकडून फसविले गेलेल्या गुंतवणुकदारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. संशयिताच्या जामीन अर्जावर आज गुरुवारी युक्तीवाद होणार आहे. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडधिकारी कल्पना गवस यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे.
रायकर (४३) याच्यासह त्याची आई रेखा आणि पत्नी निलीमा या तिघांवर आर्थिक गुन्हेगारी तपास विभागाने मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात ७४२ पानी आरोपपत्र दाखल केले आहेत.
या आरोपपत्रात १0१ साक्षीदारांची यादी जोडली आहे. या तिन्ही संशयितांवर भादंसंच्या ४0६, ४२0 यासह १२0 (ब) कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या सामानांची यादी या आरोपपत्राबरोबर जोडली आहे.
मडगावमध्ये कामाक्षी फॉरेक्स या नावाने कंपनी खोलून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्याचा संशयितावर आरोप आहे. आर्थिक गुन्हा तपास विभागात त्याच्यावर फसवणुकीची एकूण ५७0 तक्रारी नोंद असून, या गुंतवणुदारांकडून त्याने ४0 कोटी ९६ लाख १४ हजार ८७७ रुपये उकळलेले आहे. या शिवाय मडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द २९0 तक्रारी आल्या होत्या. या गुंतवणुदारांकडून त्याने १२ कोटी ९४ लाख, ६१ हजार ६४७ रुपये हडपलेले आहे. या तक्रारी मागाहून मडगाव पोलिसांनी आर्थिक गुन्हा तपास विभागाकडे वर्ग केल्या होत्या. भारतीय तसेच विदेशी चलन गुंतवून दुप्पट करण्याचे आमिष दाखवून संशयितांने गुंतवणुकदारांना फसविले होते.
तपासात निलेश रायकर व रेखा रायकर हे कामाक्षी फॉरेक्सच्या संचालक असून, निलिमा रायकर उर्फ झामिरो फर्नांडीस ही कार्यालयीन कामकाजात त्यांना मदत करत होती. रायकर याच्या नावे कामाक्षी बुल्लीवन प्रा.ली. कामाक्षी ग्लोबल ट्रेड अँण्ड फायनान्स लि.मी., कामाक्षी हॉलिडेस प्रा.ली. अन्य तीन कंपन्यांचीही नोंद आहे कामाक्षी फॉरेक्स प्रा.ली. कंपनीच्या तसेच स्वतच्या नावे संशयितांचे अनेक बँकेमध्ये खाते असून, त्या खात्याच्या रक्कमेची तपासणी करणे बाकी आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अन्य काही बँकामध्येही त्याने गुंतवणुक केल्याचा संशय असून, त्यासाठी तपास करण्यासाठी रायकर याची न्यायालयीन कोठडी गरजेची आहे हेही पोलिसांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आहे. जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करण्याचाही धोका आहे. पोलीस अजूनही या फसवणुक प्रकरणाचा तपास करत आहे. प्राथमिक आरोपपत्र सदया संशयितावर दाखल केले असून, पुरवणी आरोपपत्र अजूनही दाखल होणे बाकी आहे असेही पोलिसांनी म्हंटले आहे. संशयिताचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे त्यामुळे तो जामीनासाठी अपात्र आहे असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान काल बुधवारीही न्यायालयात रायकर यांच्याकडून फसविले गेलेल्या गुंतवणुकदारांची एकच गर्दी होती. 

Web Title: Kamakshi forex has a net worth of Rs 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.