कार्ल वाझ यांचा ‘आप’मध्ये प्रवेश
By Admin | Published: August 19, 2016 02:10 AM2016-08-19T02:10:04+5:302016-08-19T02:10:24+5:30
मडगाव : मुरगावचे माजी आमदार कार्ल वाझ यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गुरुवारी मडगावात एका पत्रकार परिषदेत वाझ यांनी
मडगाव : मुरगावचे माजी आमदार कार्ल वाझ यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गुरुवारी मडगावात एका पत्रकार परिषदेत वाझ यांनी या पक्षात प्रवेश करताना आपण सैनिक म्हणून या पक्षात आलो आहोत. मात्र, पक्षाने जबाबदारी सोपविल्यास कमांडरही बनू असे सांगत आगामी निवडणुकीत आपतर्फे निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले. आपचे गोवा प्रभारी पंकज गुप्ता, गोवा राज्य निमंत्रक राजश्री नगर्सेकर, रूपेश शिंक्रे, लिबी मेन्डोस्का आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आज राजकारणी अमाप पैसा खर्च करत आहेत. हा पैसा करदात्यांचा आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ पाहात आहे. त्यामुळे प्रभावित होऊन आपण या पक्षात प्रवेश केल्याचे वाझ यांनी सांगितले. राजकारणात राहून भ्रष्टाचारापासून दूर राहणे कठीण आहे. मात्र, आपचा नारा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असा आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
आपचा नारा हा राष्ट्रीय संपत्ती वाचवा असा आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी सांगितले. आप पक्ष खासकरून अल्पसंख्याकांची मतविभागणी करण्यासाठी गोव्यात आला आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता गुप्ता यांनी या आरोपाचे खंडन केले. उत्तर गोव्यात आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही मतविभागणीसाठी नाही आलो. सर्व जातीजमातीच्या मर्यादा पार करून लोकांकडून आम्हाला प्रतिसाद लाभत आहे. कॉँग्रेसचे नेते आम्ही मतविभागणी करत असल्याचे सांगतात. ते एकाच घटकाच्या मतांवर विसंबून आहेत. तर मुख्यमंत्री आम्ही कॉँग्रेसची मते विभागणार असे सांगतात. आम आदमी पक्ष सर्व लोकांना सामावून घेऊन भारत एक नंबरचा देश बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)