गोवा विधानसभेत कर्माचा वाद

By वासुदेव.पागी | Published: August 8, 2023 12:51 PM2023-08-08T12:51:23+5:302023-08-08T12:52:24+5:30

"आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले."

Karma Debate in Goa Legislative Assembly | गोवा विधानसभेत कर्माचा वाद

गोवा विधानसभेत कर्माचा वाद

googlenewsNext

पणजी : ताम्नार वीज वाहिन्या प्रकल्पासाठी कर्नाटकातच अलाईन्मेंट निच्छित झालेली नसताना गोवा सरकर गोव्यात हा प्रकल्प निश्चित कसा काय करू शकते, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. त्यावर थेट उत्तर न देता वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी माणसाने आपली कर्मे चांगली केली पाहिजेत, असे म्हणत मुद्द्यावर कर्मवादावर चर्चा सुरू झाली.

आपल्या प्रश्नावर अचूक उत्तर न देता मंत्री कर्मांवर बोलतात हे पाहून विजय सरदेसाई यांनी मंत्री ढवळीकर यांनी  निवडणुकीपूर्वी कर्मे वेगळी होती आणि आता सरकारात सामील झाल्यानंतर वेगळी आहेत असे सांगितले. निवडणुकीपूर्वी ममता बेनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस बरोबर युती केलेले ढवळीकर यांनी ताम्नार प्रकल्पाला विरोध केला होता याची आठवण करून दिली. आता सरकारात सामील होऊन मंत्री भलतीच कर्मे करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारच्या अशा कर्मांमुळे गोव्याची वाट लागत असल्याचे सांगितले.

मंत्र्यांनी ताम्नार प्रकल्प हा गोव्याच्या भल्यासाठीच असल्याचे सांगितले. कर्र्नाटकातून वीज आणण्यासाठीचा हा विद्यमान प्रकल्प आंबेवाडी येथून सुरू होतो. तेथून सांगोडा व नंतर धारबांदोडा आणि तेथून कुंकळ्ळी आणि नंतर  तेथून शेल्डे येथे या वीज वाहिन्या ओढल्ल्या जाणार आहेत.  या प्रकल्पासाठी १०३ टॉवर पूर्ण झाले आहेत असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पात १४ हजार झाडे कापली जाणार असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला, परंतु झाडे अधिक कापावी लागणार नसल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. परंतु नेमकी किती झाडे कापावी लागणार असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता यावर उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी वेळ मागितला
 

Web Title: Karma Debate in Goa Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.