बायणाप्रश्नी गोवा विरुद्ध कर्नाटक वाद नको
By admin | Published: April 17, 2015 02:04 AM2015-04-17T02:04:57+5:302015-04-17T02:05:09+5:30
पणजी : बायणा येथील झोपडपट्टीचा विषय हा गोवा विरुद्ध कर्नाटक असा कोणी करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी
पणजी : बायणा येथील झोपडपट्टीचा विषय हा गोवा विरुद्ध कर्नाटक असा कोणी करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. एक प्रकारे त्यांनी ही काँग्रेस नेत्यांना सूचना केली.
आपण मुख्यमंत्री म्हणून नवे आहोत. बायणाच्या झोपडपट्टीचा विषय हा जुना आहे. आपण विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व इतरांशी बोलून त्यावर तोडगा काढू, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटकचे पर्यटनमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी आपल्याशी भेटून याविषयावर चर्चा केली आहे. देशपांडे यांनी राणे व आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासोबत पार्सेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की बंगळुरूमध्ये गोव्याचे १५-२० हजार तरुण आयटी क्षेत्रात राहतात. त्यांना आम्ही सहकार्य करतो. मला तुम्ही इथे म्हादईचा विषय विचारू नका. मी येथे गरिबांच्या रक्षणासाठी आलो आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, की आमचे लोक बंगळुरू असो किंवा हैदराबाद किंवा पुणे-मुंबईत असो, ते नीटनेटके राहतात. (खास प्रतिनिधी)