केजरीवाल उद्यापासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; घेणार लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा
By किशोर कुबल | Published: January 17, 2024 02:19 PM2024-01-17T14:19:45+5:302024-01-17T14:21:07+5:30
पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
पणजी : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या १८ रोजी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान आणि खासदार राघव छड्डा व संदीप पाठक हेही केजरीवाल यांच्यासोबतसोबत असतील. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आहे.
पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
लोकसभेसाठी दक्षिण गोव्यात तीन तर उत्तर गोव्यात दोघांची नावे -
दरम्यान, पालेकर एका प्रश्नावर म्हणाले की, विरोधकांच्या' इंडिया' आघाडीने अजून गोव्यातील जागावाटप निश्चित केलेले नाही. ते होताच आम्ही आमचे उमेदवार ठरवू. दक्षिण गोव्यासाठी तीन तर उत्तर गोव्यासाठी दोन इच्छुक उमेदवारांची नावे आलेली आहेत. पुढील आठ ते दहा दिवसात राष्ट्रीय नेत्यांनी 'इंडिया' आघाडीबाबत गोव्यातील चित्र स्पष्ट करावे, अशी विनंती आम्ही केंद्रीय नेत्यांकडे केलेली आहे.'