केजरीवाल काँग्रेसमुक्त भारत कारस्थानाचा भाग
By admin | Published: August 26, 2016 07:49 PM2016-08-26T19:49:01+5:302016-08-26T19:49:01+5:30
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काँग्रेसमुक्त भारत कारस्थानाचा एक भाग असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस
Next
>- राजू नायक
पणजी, दि. 26 - आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काँग्रेसमुक्त भारत कारस्थानाचा एक भाग असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस व गोव्याचे पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी शुक्रवारी येथे ‘आप’ने गोव्यात जोरदार राजकीय बांधणी चालविल्याच्या पाश्र्वभूमीवर केली.
‘आप’ची एकूण राजकीय व्यूहरचना ही काँग्रेसला नमवून भाजपाला शक्ती देणारी आहे, असे वक्तव्य त्यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.
‘आप’ने गोव्यात काँग्रेसची खात्रिशीर मते असलेल्या ािस्ती प्राबल्याच्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी चालविली आहे. तेथे त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रसारमाध्यमांच्या अंदाजावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, केजरीवाल हे दिल्लीत युपीए सरकारविरोधात विवेकानंद ब्रिगेडने सुरू केलेल्या चळवळीचा सक्रिय भाग होते आणि त्यांचे लक्ष्य काँग्रेसला नेस्तनाबूत करणो हेच आहे. गोव्यात काँग्रेसला जाणारी खात्रिशीर मते तोडणो हेच उद्दिष्ट त्यांना ठरवून दिलेले आहे.
गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केलेली असून निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती पुढच्या महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू होईल. कोणत्या पक्ष किंवा संघटनांबरोबर युती करायची त्यासंदर्भात आम्हाला अद्याप कोणाकडून प्रस्ताव आलेला नाही; परंतु पक्षाचे विविध नेते व सघटनांबरोबर यासंदर्भात आमची चर्चा चालू आहे. विविध घटकांना विश्वासात घेऊनच आम्ही आमचे धोरण निश्चित करू, असे ते म्हणाले.
एनएसयूआयला गोवा विद्यापीठाची निवडणूक लढविण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी भाजपाने सरकारी यंत्रणोचा वापर केला, त्याचा समाचार घेताना सिंग यांनी भाजपा स्वत:चा राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी कोणत्याही थराला जातो; परंतु त्यामुळे जनमानसात घृणा निर्माण होत असते, असे म्हटले. भाजपाने गोव्यात जनतेचा विश्वास गमावला आहे आणि जनतेचा काँग्रेस पक्षाला मिळणारा पाठिंबा दिलासाजनक असल्याचे मत व्यक्त केले.