गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:50 PM2019-01-30T19:50:23+5:302019-01-30T19:51:52+5:30

गोवा पोलिसांनी जोसेफ अचोला ओयमा (51) या केनियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन आणि एलएसडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

Kenyan citizen arrested with the 2.40 lakh rupees drugs in Goa | गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गोव्यात केनियन नागरिकाकडून 2.40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Next

सूरज पवार 

मडगाव: गोवा पोलिसांनी जोसेफ अचोला ओयमा (51) या केनियन नागरिकाला अटक करत त्याच्याकडून कोकेन आणि एलएसडी अमली पदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत एकूण 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यातील कोळंब येथे काणकोण पोलिसांनी या ड्रग्स पेडलरच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडे 3.10 ग्रॅम कोकेन सापडला असून त्याची किंमत 15 हजार रुपये आहे.  तसेच 2 लाख 25 हजार  किमतीचे 2.25 ग्रॅम एलएसडीही सापडले आहे.  याव्यतिरिक्त 1 हजार 400 रुपये आणि एक मोबाइलही पोलिसांनी संशयिताकडून जप्त केले आहे.

ओयमा हा अमली पदार्थ विक्री व्यवसायात गुंतला असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे काणकोण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात संशयित सापडला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम 20 (क), 20 (ब) अंर्तगत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर हे तक्रारदार आहे. उपनिरीक्षक धीरज देविदास यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस तपास चालू आहे.

दरम्यान, ओयला हा भारतात व्हिसा संपला तरी राहत होता, असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. 2011 पासून त्याचे बेकायदेशीर वास्तव होते. पोलिसांनी  त्याच्यावर कलम 3 (2)(अ) आणि 6 (अ) पासपोर्ट एन्ट्री इनटू इंडिया कायदा 1950, कलम 3 व 4 पासपोर्ट एन्ट्री इनटू इंडिया 1920 व कलम 7 (1) (3)व कलम 14 फॉरेनर्स अॅक्ट 1946 अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.


 

Web Title: Kenyan citizen arrested with the 2.40 lakh rupees drugs in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.