खाडे दाम्पत्य ठरले वेगवान जलतरणपटू; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वीरधवलला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:54 PM2023-10-31T22:54:17+5:302023-10-31T23:06:38+5:30

ही स्पर्धा कांपाल स्विमींग पूलमध्ये पार पडली.

Khade couple turned out to be fast swimmers; Veer Dhaval won gold medal in national sports competition | खाडे दाम्पत्य ठरले वेगवान जलतरणपटू; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वीरधवलला सुवर्णपदक

खाडे दाम्पत्य ठरले वेगवान जलतरणपटू; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वीरधवलला सुवर्णपदक

पणजी : महाराष्ट्रीचे स्विमींट पावर दाम्पत्य विरधवल आणि रुतुजा खाडे यांनी येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेगवान जलतरणपटू होण्याचा विक्रम नोंदवला. ही स्पर्धा कांपाल स्विमींग पूलमध्ये पार पडली.

२०१० च्या आशियायई क्रीडा स्पर्धेचील कांस्यविजेता असलेल्या विरधवलने ५० मीटर जलतरणमध्ये  २२:८२ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक प्राप्त केले. तर कर्नांटकच्या श्रीहरी नटराजने २२:९१ सेकंद वेळ नोंदवत रौप्य तर महाराष्ट्रच्या मिहीर आंब्रेने २२:९९ सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. 

तर ५० मीटर जलतरण महिला विभागात रुतुजाने २६:४२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. तर आसामच्या शिवांगी शर्मा (२६:८० सेकंद)ने रौप्य तर पश्चिम बंगालच्या जान्हवी चौधरीने (२६:८९ सेकंद) कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्रने आतापऱ्यंत ५२ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३६ कांस्य पदकांसह १२३ पदके मिळवित स्पर्धेत अव्वलस्थान प्राप्त केले आहे. तर सेवादलाने १९ सुवर्ण पदके आणि हरयाणाने १८ सुवर्ण पदके प्राप्त केली.

Web Title: Khade couple turned out to be fast swimmers; Veer Dhaval won gold medal in national sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.