12 जानेवारीपासून खोतीगावला सरकारचा पक्षी महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 07:58 PM2018-01-05T19:58:14+5:302018-01-05T20:03:26+5:30
सरकारच्या वनखात्याने येत्या दि. 12 ते 14 दरम्यान खोतीगाव अभयारण्यात दुस:या पक्षी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मुख्य वनपाल अजय सक्सेना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली
पणजी : सरकारच्या वनखात्याने येत्या दि. 12 ते 14 दरम्यान खोतीगाव अभयारण्यात दुस:या पक्षी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मुख्य वनपाल अजय सक्सेना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सक्सेना म्हणाले की, अरबी समुद्रामुळे मोठय़ा प्रमाणात दरवर्षी राज्यात परदेशी पक्षांचे आगमन होत असते. येथील वनसंपदेमुळे या पक्षांना सुरक्षितता वाटते. खोतीगावचे अभयारण्य पक्षी संरक्षणासाठी ओळखले जात असल्याने येथे नेहमी पक्षीतज्ज्ञ भेट देत असतात. पक्षांच्या सान्निध्यात काही काळ घालविण्यास मिळावा म्हणून अनेकजण विविध देशात, राज्यात भ्रमंती करीत असतात. जैवविविधतने परिपूर्ण असलेली जगातील 25 ठिकाणो पश्चिम घाटात आहेत. या महोत्सवातून पक्षांचे निरीक्षण कसे करायचे याचे ज्ञान मिळते.
राज्यात पहिला पक्षी महोत्सव गेल्यावर्षी
बोंडला अभयारण्यात झाला होता. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. या महोत्सवात पक्षी निरीक्षण, व्याख्यान, पक्षांचे आवाज ओळखणो, छायाचित्रिकरण स्पर्धा आणि प्रदर्शन, त्याचबरोबर स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या हस्तकलेच्या साहित्याची विक्री करणारे महिला स्वयंसाह्य गटही असतील. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणो अपेक्षित असून, त्यासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या रकमेत सहभागी होणा:या प्रतिनिधीची दोन दिवस निवासाची जेवणाची सर्व सोय केली जाणार आहे. ही रक्कमसुद्धा ऑनलाईनच भरावी लागणार आहे. या वर्षी दोनशेपेक्षा अधिक पक्षीप्रेमी सहभागी होतील, असे सक्सेना म्हणाले.
सक्सेना म्हणाले की, या महोत्सवानिमित्त काणकोण तालुक्यातील 18 शालेय विद्याथ्र्याची नुकतीेच दौड काढण्यात आली. त्याचबरोबर ‘गोव्याचा पक्षी’ या विषयावर वन खात्यातर्फे छायाचित्रिकरण स्पर्धा आयोजिली असून, ते पाठविण्याची आज मुदत संपली आहे. या स्पर्धेसाठी 65 स्पर्धकांनी छायाचित्रे पाठविली आहेत. यातील तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जातील.
या प्रमुखांचा सहभाग !
या महोत्सवात शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश हे ‘गिधाडांचे संरक्षण’ या विषयावर व्याख्यान देतील. त्याचबरोबर डॉ. प्रताप सिंग हे ‘रेकॉर्डिग बर्ड कॉल्स’वर, तर शरद आपटे ‘बर्ड कॉल्स अँड साँग्स’ या विषयावर बोलतील. डॉ. सतीश पांडे यांचे ‘अंधविश्वासामागील विज्ञान’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळुरूचे शिव शंकर हे ‘पश्चिम घाटातील पक्षी आणि याच घाटातील भयानक पक्षी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच नवीदिल्लीचे रोहन चक्रवर्ती ‘पक्षांची चित्रे रेखाटणो’ व कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ कार्तिकेयन हे ‘नैसर्गिक शिबिराचे आयोजन-जेएलआर एक अनुभव’ यावर आपले विचार मांडतील.