बेळगावचा फारार ख्वाजा अस्लम गोव्यातही लपू शकतो; गोवा पोलीस सतर्क
By वासुदेव.पागी | Published: May 30, 2024 03:25 PM2024-05-30T15:25:49+5:302024-05-30T15:26:52+5:30
गोवा पोलीसही सतर्क झाले आहेत.
वासुदेव पागी, पणजी: बेळगाव पोलिसांच्या कैदेतून निसटून पळालेला अट्टल चोरटा ख्वाजा अस्लम याच्या शोधासाठी बेळगाव पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ चालविली आहे. तो कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर असल्यामुळे तो गोव्यात दडून राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे गोवा पोलीसही सतर्क झाले आहेत.
ख्वाजा अस्लम बेळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्यापासून महाराष्ट्रात त्याचा कसून शोध घेण्यात आला. परंतु तो सीमापार पळाल्याने पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळे गोवा पोलिसांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण यापूर्वीही इतर राज्यातून फरार झालेले चोरटे, अतिरेकी, नक्षलवादी, गँगस्टर आणि दरोडेखोर गोव्यात सापडले होते. गोव्यातत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे बेळगांवहून पळालेला ख्वाजा अस्लमही गोव्यात कुठे तरी दडून बसण्याची शक्यता नाकारतां येत नसल्यामुळे गोवा पोलीसी सतर्क झाले आहेत.
मुख्य म्हणजे ख्वाजा अस्लम हा गोवा पोलिसांनाही हवा आहे. कारण गोव्यातही अनेक ठिकाणी त्याने गुन्हेगारी कारनामे केले आहेत. त्यामुळे गोवा पोलीसी त्याचा शोध घेत आहेत. हॉटेल्स व कँसिनोंवरही पोलीसांचे लक्ष्य आहे. अस्लमचा २० पेक्षा अधिक घरफोड्यांत हात आहे. चोरीच्यावेळी तो स्वतःजवळ धारधार शस्त्रे बाळगता आणि त्याचा वापरही करण्यास कचरत नाही.