किरण कांदोळकर गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 09:33 PM2020-10-27T21:33:34+5:302020-10-27T21:33:40+5:30

विजय सरदेसाई : उद्या होणार अधिकृत घोषणा

Kiran Kandolkar is the Executive President of Goa Forward | किरण कांदोळकर गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष

किरण कांदोळकर गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष

googlenewsNext

मडगाव: भाजपाला रामराम ठोकून गोवा फॉरवर्ड मध्ये दाखल झालेले थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांची नियुक्ती गोवा फॉरवर्डच्या कार्यकारी अध्यक्षपदी करण्यात येणार आहे. उद्या बुधवारी याची अधिकृत घोषणा होणार आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली. सध्या आमच्या भाजपाचे  नेते सामील झाले आहेत येत्या 14 महिन्यात गोव्याचे हितरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले इतर पक्षातील समविचारी नेतेही सामील होतील असे सूतोवाच त्यांनी केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजपचे मांद्रे येथील नेते दीपक कलांगुटकर यांनी तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला असून त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी ही घोषणा केली आहे.

या वृत्तवाहिनीशी बोलताना सरदेसाई म्हणाले,  भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इतर सर्व पक्षांनी एकत्र यावे अशी लोकांची भावना आहे. आम्हालाही तसेच वाटते पण गोव्याचे हीत सांभाळून ठेवायचे असल्यास राष्ट्रीय पक्षांचे सरकार सत्तेवर असणे राज्याच्या फायद्याचे नाही हे आम्हाला म्हादईच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. भाजपने आपल्या राष्ट्रीय फायद्यासाठी म्हादई कर्नाटकाला विकली. याला काँग्रेसने विरोध करण्याची गरज होती. पण काँग्रेसचा विरोधही केवळ दाखविण्यापुरताच आहे. कारण त्यांचे जे राज्य प्रभारी आहेत ते गुंडू राव हे स्वतः म्हादईचे पाणी कर्नाटकाला मिळावे या मताचे आहेत. त्यामुळेच सध्या गोव्यात असताना त्यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले असे सरदेसाई म्हणाले.

गोव्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ स्थानिक पक्षांचेच सरकार पाहिजे हे आता सिद्ध झाले आहे. अशा शक्तींना एकत्र करण्याचा पुढच्या 14 महिन्यात आमचा प्रयत्न असेल पुढचे सरकार भाजपाचे नसेल यासाठी योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असेही ते म्हणाले.

 

Web Title: Kiran Kandolkar is the Executive President of Goa Forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.