कोलवाळ पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले
By काशिराम म्हांबरे | Published: April 13, 2023 08:35 PM2023-04-13T20:35:26+5:302023-04-13T20:35:35+5:30
म्हापसा: कोलवाळ पोलिसांनी काल गुरुवारी मुशिरवाडा येथेकोम्बिंग आॅपरेशन अंतर्ग भाडेकरू तपासणी मोहिम हाती घेतली. या मोहिमे दरम्यान पोलिसांनी १०१ व्यक्तींना ...
म्हापसा: कोलवाळ पोलिसांनी काल गुरुवारी मुशिरवाडा येथेकोम्बिंग आॅपरेशन अंतर्ग भाडेकरू तपासणी मोहिम हाती घेतली. या मोहिमे दरम्यान पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यातील ३९ व्यक्तींकडे कसल्याच प्रकारची कागदपत्रे नसल्याचे यावेळी त्यांना आढळून आले. अशा सर्व व्यक्तीवर सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सर्वांना न्यायदंडाधिकाºयासमोर हजर करून नंतर सोडून देण्यात आले. घटनेनंतर कोलवाळ पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात दक्षता बाळगण्यास आरंभ केला असून पोलीस गस्तीतही वाढ केली आहे.
काही महिन्यापूर्वी कोलवाळ पोलिसांकडून लाला की बस्ती यात अशाच प्रकारची मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेली कोलवाळ पोलिसांची ही दुसरी मोहिम होती. काल पहाटे ६ वाजल्या पासून उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली तसेच निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यात त्यांच्या सोबत उपनिरीक्षक मंदार नाईक, कुणाल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत, संतोष आर्लेकर तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर इतर राज्यातून आवश्यक कागदपत्रे नसताना गोव्यात वास्तव करून राहणाºया तसेच विविध प्रकारच्या लहान मोठ्या गुन्ह्यात सहभागी असणाºयांची तपासणी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या व्यक्तीतील बहुतांश व्यक्ती हे झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट, कर्नाटक, पश्चीम बंगाल सारख्या राज्यातील आहेत.