कोकण रेल्वेची डिसेंबरमध्ये तब्बल ६,६७५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई
By किशोर कुबल | Published: January 15, 2024 01:28 PM2024-01-15T13:28:51+5:302024-01-15T13:32:39+5:30
१ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल
किशोर कुबल, पणजी: विना तिकीट फुकट्या प्रवाशां विरूद्धची मोहीम चालूच ठेवताना कोकण रेल्वेने डिसेंबरमध्ये ६,६७५ जणांवर कारवाई करीत तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये दंड वसूल केला. जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ॲाक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात एकूण वेगवेगळ्या मार्गांवर धावणाय्रा कों. रे. गाड्यांमध्ये १८,४६६ फुकट्या प्रवाशांकडून ५ कोटी ६० लाख ९९ हजार १७ रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोकण रेल्वे सातत्याने तिकिट तपासणी मोहीम राबवत आहे. वैध तिकीटाशिवाय कोणीही रेल्वे प्रवास करु नये, असे आवाहन कोकण रेल्वेच्या अधिकाय्रांनी केले आहे. तिकीट तपासणी मोहीम आगामी काळात आणखी तीव्र केली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.