दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक; करंजाडी-कामथे व कुमटा-भटकळ मार्गाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:27 AM2023-11-20T08:27:26+5:302023-11-20T08:29:41+5:30

काही प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.

konkan railway mega block for repair work section of karanjadi kamthe and kumta bhatkal route | दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक; करंजाडी-कामथे व कुमटा-भटकळ मार्गाची निवड

दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगा ब्लॉक; करंजाडी-कामथे व कुमटा-भटकळ मार्गाची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : करंजाडी-कामथे आणि कुमटा-भटकळ मागावरील देखभाल व दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे काही प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.

करंजाडी कामथे विभाग २१ नोव्हेंबर (मंगळवार) १२.४० ते १५.१० तास (एकूण २.३० तास) गाडी क्र.०२१९७ कोइम्बतूर - जबलपूर २० रोजी सुरू होणारा विशेष प्रवास मडगाव संगमेश्वर रोड विभागादरम्यान ११० मिनिटांसाठी नियमित करण्यात आला आहे. गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास दि. २१ रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड-संगमेश्वर रोड विभागादरम्यान ७० मिनिटांसाठी नियमित करण्यात आला आहे.

कुमटा भटकळ विभाग दि. २३ (गुरुवार) दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत (३ तास). रेल्वे गाडी क्र. १६५८५ सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू - मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा प्रवास २२ रोजी सुरू होणारा प्रवास भटकळ स्टेशनवर अल्पकाळ थांबेल. भटकळ - मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द केला जाईल. गाडी क्र. १६५८६ मुर्डेश्वर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू एक्स्प्रेसचा प्रवास दि. २३ रोजी भटकळ स्थानकावरून नियोजित वेळेवर सुरू होईल आणि मुर्डेश्वर - भटकळ विभागादरम्यान अंशतः रद्द होईल.

गाडी क्र. २२११४ कोचुवेली लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास दि. २३ रोजी सुरू होणारा भटकळ स्टेशनवर २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.


 

Web Title: konkan railway mega block for repair work section of karanjadi kamthe and kumta bhatkal route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.