कोकण रेल्वेने ‘रेंट अ बाईक’ची निविदा रद्द करावी: टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:37 PM2024-05-23T15:37:49+5:302024-05-23T15:38:19+5:30
कोकण रेल्वेने रेल्वे स्थानकावर रेंट अ बाईकसाठी काढलेली निविदा रद्द करावी. यामुळे येथे मिळेल ते लाेक रेंट अ बाईकचा व्यावसाय करणार आहे.
नारायण गावस
पणजी: कोकण रेल्वेने रेल्वे स्थानकावर रेंट अ बाईकसाठी काढलेली निविदा रद्द करावी. यामुळे येथे मिळेल ते लाेक रेंट अ बाईकचा व्यावसाय करणार आहे. याचा फटका स्थानिक गाेमंतकीयांच्या व्यवसायावर बसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन ही निविदा रद्द करावी अशी मागणी तृणमूल कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्राेजन डिमेलो यांनी केली आहे.
ट्रोजन डिमेलो म्हणाले, काेकण रेल्वेने अशा प्रकारे रेल्वे स्थानकावर रेंट बाईकसाठी निविदा काढणे चुकीचे आहे. हे कुणासाठी केेले जात आहे. येथे रेंट अ बाईक ठेऊन स्थानिक रेंट अ बाईक व्यावसायिकांचा धंदा धोक्यात येणार आहे. गोव्यात अगोदरच बेराेजगारी वाढत आहे. मोठ्या प्रमाणात युवक सध्या किनारी भागात व अन्य पर्यटन स्थळी रेंट बाईकचा व्यवसाय करत आहेत. आता कोकण रेल्वे ठिकाणी रेंट अ बाईक पर्यटकांना मिळाली तर या युवकांचा व्यावसाय संकटात येणार. त्यामुळे बेराेजगारी आणखी वाढणार आहे. म्हणून आम्ही हे काेकण रेल्वेने काढलेले रेंट अ बाईकची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
ट्राेजन डिमेलो म्हणाले, जर काेकण रेल्वेने रेंट अ बाईक सुरु केली तर मिळेल तो येथे व्यावसाय करणार आहे. याचा लाभ आमच्या स्थानिक गाेमंतकीयांना येथे धंदा करायला मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. आमचा हा स्थानिक व्यावसाय कुठल्या कंत्राटदाराच्या घशात जाऊ नये.