गोव्याचा ७५ टक्के ग्रामीण भाग कोविडबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:47 PM2020-09-04T18:47:49+5:302020-09-04T18:48:01+5:30
साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सध्या एकूण २४९ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
पणजी : जागतिक नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून मिरवणाºया गोव्याचा ७५ टक्के ग्रामीण भाग कोविडबाधित झाला आहे. आरोग्य खात्याकडून प्राप्त अधिकृत बुलेटिन तपासले असता गुरुवारी तब्बल ७१३ नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यात ७५ टक्के ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेतील आहेत.
साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सध्या एकूण २४९ सक्रीय कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी या केंद्राच्या कक्षेत २७ नवे कोविडबाधित आढळले. वाळपई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत एकूण १५९, पेडणेत २0७, काणकोण ११७, शिरोडा ९५, कुडचडें १३५, हळदोणे ११७, मडकई ४६, कुठ्ठाळी ११८, चिंबल १४३, नावेली १0४, शिवोली १२५, कोलवाळ १४३ तसेच कांदोळी, बेतकी, बाळ्ळी, कांसावली, कुडतरी, धारबांदोडा, लोटली, चिंचिणी, खोर्ली व कासारवर्णे आदी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेतही कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक ते दोन आरोग्य केंद्रांमध्ये ८ देखिल पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत.
आॅगस्टमध्ये रोज सरासरी ५ मृत्यू!
आॅगस्ट महिना गोमंतकीयांसाठी अत्यंत घात महिना ठरला. आतापर्र्यंत एकूण २१२ मृत्यू झाले आहेत, त्यात १५0 बळी हे केवळ आॅगस्टमध्येच गेलेले आहेत. गेल्या तीन दिवसातच तब्बल १७ बळी गेले आहेत.
- आॅगस्टमध्ये जे १५0 मृत्यू झाले त्यात ११५ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. कोविडने मृत्युचे प्रमाण महिलांमध्ये कमी आहे.
- लोकसंख्या घनता असलेल्या सासष्टी तालुक्यात आॅगस्टमध्ये सर्वाधिक ४३ मृत्यू झाले. यात केवळ मडगांव शहरातील ३४ जणांचा समावेश आहे.
- गेल्या तीन दिवसात कोविडने मृत्युचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मंगळवारी १ सप्टेंबर रोजी ४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युचा आलेख वाढतच गेला. दुसºयाच दिवशी २ रोजी १0 बळी गेले तर काल गुरुवारी ८ बळी गेले.
..............
आॅगस्टमधील तालुकानिहाय मृत्यू
सासष्टी ४३
मुरगांव ३३
तिसवाडी २४
फोंडा १६
बार्देस १३
डिचोली 0५
पेडणे 0४
केपें 0४
धारबांदोडा 0१
सांगे 0४
काणकोण 0१
सत्तरी 0२