कोविंद यांची आमदारांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2017 02:26 AM2017-07-16T02:26:48+5:302017-07-16T02:29:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कवास्को : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आपल्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी गोव्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आपल्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी गोव्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांचे स्वागत केले़
त्यानंतर कोविंद यांनी बोगमाळो बीच रिसॉर्टमध्ये प्रयाण केले़ या ठिकाणी भाजपचे आमदार तसेच सरकारमधील घटक पक्षांच्या आमदारांशी त्यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती़ या वेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई, मगो पक्ष नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, दक्षिण गोव्याचे खासदार अॅड़ नरेंद्र सावईकर तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीस व्यासपीठावर उपस्थित होते़ मनोहर पर्रीकर यांनी उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़ या वेळी भाजपचे मुरगावचे आमदार मिलिंद नाईक वगळता इतर सर्व आमदार, गोवा फ ॉरवर्डचे आमदार तथा मंत्री विनोद पालयेकर, जयेश साळगावकर, मगोपचे आमदार तथा मंत्री मनोहर आजगावकर, दीपक पाऊसकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, प्रसाद गावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव उपस्थित होते़
आपण घटनेशी बांधिल असून लोकशाही तंत्र पाळून राष्ट्राचे कामकाज हाताळणाऱ कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आपले काम पारदर्शी असेल, असा विश्वास त्यांनी आमदारांशी बोलताना व्यक्त केला, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़