गोव्यात आढळले कोवीडचे केपी १ व केपी २ व्हेरियंट

By वासुदेव.पागी | Published: May 22, 2024 04:53 PM2024-05-22T16:53:25+5:302024-05-22T16:54:26+5:30

केपी.१ आणि केपी .२ हे दोन्ही प्रकारचे व्हरायन्ट गोव्यासह अनेक राज्यात सापडले आहेत. जिनोम सिक्वे्सिंग अहवालानुसार गोव्यात जमविण्यास आलेल्या  सेम्पलच्या चाचणीतून या दोन्ही प्रजातींचे गोव्यातील अस्तित्व अधोरेखीत करण्यात आले आहे.

KP1 and KP2 variants of Covid found in Goa | गोव्यात आढळले कोवीडचे केपी १ व केपी २ व्हेरियंट

गोव्यात आढळले कोवीडचे केपी १ व केपी २ व्हेरियंट

पणजीः जिनोमिक सिक्वेव्सिंग अहवालानुसार गोव्यात कोविडचे केपी.१ आणि केपी.२ अशा दोन प्रजाती सापडल्या आहेत हा व्हरायन्ट अनेक देशात. पोहोचला असन तो लवकर फैलिण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

केपी.१ आणि केपी .२ हे दोन्ही प्रकारचे व्हरायन्ट गोव्यासह अनेक राज्यात सापडले आहेत. जिनोम सिक्वे्सिंग अहवालानुसार गोव्यात जमविण्यास आलेल्या  सेम्पलच्या चाचणीतून या दोन्ही प्रजातींचे गोव्यातील अस्तित्व अधोरेखीत करण्यात आले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषयीही बनला आहे. आजच्या तारखेला गोव्यात कोविडचे १२ बाधित आहेत. तसेच दर दिवसा असे बाधित आढळत आहेत. 

मात्र हे व्हरायन्ट तसे जीवघेणे नाहीत.  इतर व्हरायन्टसारखेच हे व्हरायन्ट आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असे आरोग्य खात्यातील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मात्र शक्यतो या व्हायन्ट पासून संसर्गीत होणे टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळावे तसेच मास्को वापर करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 

केपी.१ आणि केपी २ ची लक्षणे

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केपी.१ आणि केपी.२ हे देखील कोरोनाच्या जेएम१ या प्रकाराचे उप-प्रकार आहेत. याने संक्रमित रूग्णांमध्ये अद्याप कोणतीही विशेष गंभीर लक्षणे दिसली नाहीत. मात्र, तापामुळे थंडी वाजून येणे किंवा फक्त ताप येणे सतत खोकला, घसा खवखवणे, अनुनासिक रक्तसंचय किंवा वाहणारे नाक व डोकेदुखी, स्नायू दुखी आणि श्वास घेण्यात अडचण होणे तसेच थकवा येणे अशी लक्षणे आहेत. 

Web Title: KP1 and KP2 variants of Covid found in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.