इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये गोव्याच्या सामाग कुडचडकरची छाप

By समीर नाईक | Published: April 30, 2023 11:58 PM2023-04-30T23:58:10+5:302023-04-30T23:58:10+5:30

इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये गोव्याच्या सामाग कुडचडकरला मीटचा सर्वात वेगवान ड्रायव्हर म्हणून गौरविण्यात आले

Kudchadkar impresses against Goa in the Indian National Autocross Championship | इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये गोव्याच्या सामाग कुडचडकरची छाप

इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये गोव्याच्या सामाग कुडचडकरची छाप

googlenewsNext

पणजी: इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये गोव्याच्या सामाग कुडचडकरला मीटचा सर्वात वेगवान ड्रायव्हर म्हणून गौरविण्यात आले. फोंड्यातील व्यावसायिक समागने (वय २७) होंडा १५०० सीसी कार चालवत १.२ किमीचा ट्रॅक १:३६:२२ मिनिटांच्या जलद वेळेत “टाइम अटॅक” श्रेणीत अव्वल ठरला. दिल्लीच्या फिलिपोस मथाई १:३६:९९ तर बेंगळुरूच्या विवेक रुथुपर्णाने १:३९:०२ यांनी टाईम अटक विभागात अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. गोव्यातील पुरुष रेसर्समध्ये सामाग कुडचडकर, अमेय देसाई आणि अझीम हांची हे सर्वात वेगवान गटात तर कर्तवी माशेलकर मराठे, अशरफी गायकवाड आणि रेश्मा हुसेन या “टाइम अटॅक” प्रकारात गोव्यातील वेगवान महिला रेसर ठरल्या.

दरम्यान, दिल्लीच्या फिलीपोस मथाईला इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप श्रेणीतील सर्वात वेगवान ड्रायव्हर म्हणून गौरवण्यात आले. अखिल गोवा मोटरस्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव वैभव मराठे यांनी प्रात्यक्षिक मोहिमेमध्ये सर्वात जलद १:३५ मिनिटांची वेळ नोंदवली.

हा एक अतिशय वेगवान, तरीही सुरक्षित ट्रॅक आहे, कारण अनेक वळणे तुमचा वेग कमी करतात. यातून खुप काही शिकता आले. सरकारने या खेळाला पाठींबा देणे गरजेचे आहे, कारण हा एक महागडा खेळ आहे आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे गोव्याच्या चालकांना संपूर्ण भारतातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मदत होईल, असे सामाग कुडचडकर यांनी यावेळी सांगितले.

काही प्रमुख निकाल:

गोव्यातील सर्वात वेगवान पुरुष: १) सामाग कुडचडकर २) अमेय देसाई ३) अझीम हांची
सर्वात वेगवान गोमंतकीय महिला: १) कर्तवी माशेलकर मराठे २) अशरफी गायकवाड ३) रेश्मा हुसेन

सर्वात वेगवान आयएनएसी ड्रायव्हर: १) फिलिपोस मथाई
कार्यक्रमाचा वेगवान वेळ: वैभव मराठे (प्रात्यक्षिक ड्राइव्ह)

Web Title: Kudchadkar impresses against Goa in the Indian National Autocross Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा