'जिंदाल' ग्रुपकड़े कुडणे खाण ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 01:31 PM2023-04-26T13:31:00+5:302023-04-26T13:31:19+5:30
कुडणे करमळे खाण ब्लॉक-७ साठी इ लिलावात जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्ल्यू) कंपनीने बोली जिंकली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कुडणे करमळे खाण ब्लॉक-७ साठी इ लिलावात जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्ल्यू) कंपनीने बोली जिंकली आहे. सरकारला या खाण ब्लॉकच्या लिलावातून आतापर्यंतचा सर्वांत जास्त प्रीमियम मिळाला आहे. इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने (आयबीएम) निश्चित केलेल्या सरासरी विक्री किमतीच्या ९६.६५ टक्के हा प्रीमियम आहे.
दुसऱ्या टप्प्यात दोन ब्लॉकचा लिलाव पूर्ण झालेला आहे. अडवलपाल, डिचोली खाण ब्लॉकसाठी फोर्मेतो कंपनीने बोली जिंकली आहे. आणखी तीन खाण ब्लॉकचा लिलाव बाकी आहे. जिंदाल कंपनीने बोली जिंकलेला कुडणे ब्लॉक-७ मध्ये ८.३ दशलक्ष टन खनिजसाठा असल्याचे सांगण्यात आले. अडवलपालचा ब्लॉक ४६ हेक्टरचा असून, ३.८ दशलक्ष टन खनिजसाठा येथे आहे. सुर्ला-सोनशी ब्लॉक, पीर्ण-थिवी आणि कुड ब्लॉक- ६ या तीन ब्लॉकचा लिलाव बाकी आहे. खाण खात्याचे संचालक सुरेश शानबोग यांनी उर्वरित खाण ब्लॉकचा लिलावही पूर्ण केला जाईल, असे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"