दिव्यांग कलाकारांना इफ्फीत सुविधांची कमतरता, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:36 PM2023-11-22T17:36:09+5:302023-11-22T17:39:01+5:30

मॅकनीज पॅलेसमध्ये दोन दिव्यांग चित्रपट निर्मात्यांचा सन्मान होणार होता, पण...

Lack of affordable facilities for disabled artists, artists expressed displeasure | दिव्यांग कलाकारांना इफ्फीत सुविधांची कमतरता, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी

दिव्यांग कलाकारांना इफ्फीत सुविधांची कमतरता, कलाकारांनी व्यक्त केली नाराजी

नारायण गावस, पणजी-गोवा: दिव्यांगांना यंदाच्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात सुलभ अशा सोयी केल्या जाणार असे आश्वासन देण्यात आले होते. पण काही ठिकाणी दिव्यांगांना जाण्यासाठी व्हीलचेअर नव्हती. मॅकनीज पॅलेसमध्ये दोन दिव्यांग चित्रपट निर्माते व्यक्तींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता पण मॅकनीजच्या स्टेजवर चढण्यास सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यंदाच्या इफ्फीत सर्व ठिकाणी दिव्यांगांना साेयी उपलब्ध केल्या जाणार असे सांगितले होते. यासाठी सर्व स्थळे दिव्यांगांसाठी उपयाेग हाेईल अशा सुविधा केल्या जाणार असे सांगण्यात आले होते. पण तसे केेले नाही. त्यामुळे इफ्फीत देशी विदेशातून आलेल्या काही दिव्यांगजनांनी नाराजी व्यक्त केली. इफ्फी अनेक दिव्यांग कलाकारही उपलब्ध असतात. पण त्यांना या ठिकाणी जाण्यासाठी अडचण असते. व्हीलचेरची गरज भासते. तसेच त्यांच्यासाठी खास रॅम्प असतो. काही ठिकाणी सुविधा केली आहे. पण काही ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध नाही. एवढे करोडाे रुपये खर्च केले तरी पण सुविध मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आम्हा दिव्यांग व्याक्तीच्या मनात इच्छा असते आमचाही स्टेजवर सत्कार करावा. पण आम्हाला स्टेजवर जाता येत नाही. काल मेकनीज पॅलेसमध्ये आमचा सत्कार आयोजित केला होता. पण आम्हाला स्टेजवर जाता आले नाही ही खंत आहे. यंदाच्या वर्षेी झाले तसेच पुढच्या वर्षी होऊ नये. याची दखल आयोजकांनी घ्यावी, असे चित्रपट निर्माते महानंद सतरकर या दिव्यांग कलाकाराने सांगितले.

यंदा सांगूनही आयाेजकांनी सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. त्यामुळे याचा त्रास झाला आम्हाला सुविधा हव्या डिसाबिलीटी राईट् असाेसिएशन वेळोवेळी पत्र लिहून सुविधा पुरविण्याची मागणी करते. पण आम्हाला या सुविध पुरविल्या जात नाही. याविषयी आम्ही दिव्यांग आयाेगाला पुन्हा पत्र लिहीणार आहे, असे डिसाबिलीटी राईट्स असाेसिएशनचे अध्यक्ष ॲवलिनो डिसा यांनी सांगितले.

Web Title: Lack of affordable facilities for disabled artists, artists expressed displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा