आयटी पार्कमध्ये 3-4 महिन्यांत भूखंड वाटप, गोमंतकीयांना मोठी रोजगार संधी - खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 06:07 PM2017-12-15T18:07:25+5:302017-12-15T18:07:57+5:30

चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

Land allotment in IT Park in 3-4 months, big employment opportunities for Gomantakis - Khandesh | आयटी पार्कमध्ये 3-4 महिन्यांत भूखंड वाटप, गोमंतकीयांना मोठी रोजगार संधी - खंवटे

आयटी पार्कमध्ये 3-4 महिन्यांत भूखंड वाटप, गोमंतकीयांना मोठी रोजगार संधी - खंवटे

googlenewsNext

पणजी - चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
चिंबलसाठी अगोदर जमीन उपलब्ध नव्हती. अपुरी जागा मिळाली होती. गेल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य खात्याकडील 1.79 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयटी पार्कसाठी मिळाली आहे. तिथे तीन-चार हजार रोजगार संधी निर्माण होतील. तुयें येथील  इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये 6क् भूखंड तयार करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याकडे भू-रुपांतरणासाठी फाईल पाठवली आहे. तिथे चार-पाच हजार रोजगार संधी निर्माण होतील. बहुतांश नोक:या गोमंतकीयांनाच मिळणार आहेत. आम्ही योजना व धोरणोही तशाच प्रकारे तयार करत आहोत, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
गोव्यात सध्या 81 नोंदणीकृत आयटी प्रकल्प आहेत. त्यात एकूण 1 हजार 159 कर्मचारी काम करतात. त्यापैकी 884 म्हणजेच 76 टक्के गोमंतकीय आहेत. पूर्वी माहिती तंत्रज्ञानाच्या गोष्टी होत होत्या पण आवश्यक बॅक अप त्यासाठी आता तयार करण्यात आला आहे. साधनसुविधा आता तयार केल्या आहेत. 2क्15 सालचे आयटी धोरण फक्त कागदावरच राहीले होते. दोनापावल येथे आयटी हॅबिटेट होणार नाही. तो विषय यापूर्वीच संपुष्टात आला आहे. पूर्वीच्या भूखंडधारकांचे पैसेही सरकारने परत केले आहेत. चिंबल व तुये येथील प्रकल्प मात्र निश्चितच साकारतील, असा विश्वास खंवटे यांनी व्यक्त केला. गोव्यातील मनुष्यबळावर परराज्यांत जाण्याची वेळ येऊ नये. येथील बुद्धीमत्ता वाया जाऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. स्थानिकांनाच आयटी व स्टार्ट अपमध्ये प्राधान्य असेल. गोमंतकीयांना रोजगार देऊ शकतील, अशा परप्रांतांतील मोठय़ा आयटी कंपन्यांचे गोव्यात स्वागत केले जाईल. सरकारच्या स्टार्ट अप योजनेची चांगली फळे यापुढे गोव्यात दिसू लागतील. वर्षअखेरीस अंमलबजावणी सुरू होईल. मनुष्यबळविषयक धोरणो लवकरच तयार होतील, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले. 
हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो यांनी याबाबतचा मूळ प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासावेळी मांडला होता

Web Title: Land allotment in IT Park in 3-4 months, big employment opportunities for Gomantakis - Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.