जमिनी राखणारे बाहेर, लुटणारे मात्र आत; कोमुनिदाद परिषदेत प्रवेश नाकारल्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी केला निषेध
By पूजा प्रभूगावकर | Published: January 14, 2024 01:41 PM2024-01-14T13:41:48+5:302024-01-14T13:42:16+5:30
काेमुनिदाद परिषदेत प्रवेश नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: जमिनी राखणारे बाहेर, लुटणारे मात्र आत अशी प्रखर टीका करुन दोनापावला येथील एनआयओ सभागृहात काेमुनिदाद प्रतिनिधींसाठी आयोजित काेमुनिदाद परिषदेत प्रवेश नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला.
कोमुनिदाद ही एक स्वतंत्र संस्था असून ती सरकारने ती सशक्त करण्याजी गरज आहे. मात्र त्याएवजी सरकार त्याचे अधिकार काढून घेत आहे. सरकार कोमुनिदादचच्या जमिनी नष्ट करु पहात आहे. त्यामुळेच कोमुनिदाद प्रतिनिधींच्या परिषदेला गावकारांना आमंत्रित करण्याएवजी कोमुनिदादचे अधिकार स्वत:कडे ठेवलेल्या मोजक्याच लोकांना त्यांनी बोलावल्याचा आरोपही त्यांनी केला.
पर्यावरणप्रेमी अभिजीत प्रभूदेसाई म्हणाले, की या परिषदेला गावकरांना डावलून मोजक्या ठरावीक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले. कोमुनिदाद ही कुणाची खासगी मालमत्ता नसून सरकारने मतांसाठी राजकारण करु नये. ज्या ठिकाणी गावकारांनाच स्थान नाही ती कोमुनिदादची परिषदच बेकायदेशीर आहे. आम्हाला मुद्यामहून डावलेले .कोमुनिदादच्या जमिनी या शिक्षण, आरोग्य सुविधा उभारण्यासाठी तसेच जमीन नसलेल्यांना दिली जाते. सरकारी प्रकल्पांसाठी नाही. मात्र सरकार कोमुनिदाद जाग्यावर प्रकल्प आणू पहात आहे. आमच्या भावी पिढीसाठी या जमिनी राखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.