राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली: सनबर्नला गोव्यात परवानगी नको; कॉंग्रेसची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: December 30, 2023 06:07 PM2023-12-30T18:07:19+5:302023-12-30T18:07:35+5:30
सनबर्नसारख्या संगीत कार्यक्रमांना गोव्यात परवानगी दिली जावू नये अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
पणजी: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे मागील काही घडलेल्या घटनांवरुन दिसून येत आहे. सनबर्नसारख्या संगीत कार्यक्रमांना गोव्यात परवानगी दिली जावू नये अशी मागणी कॉंग्रेसने सरकारकडे पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
सनबर्न संगीत महोत्सव हा एकप्रकारे वादग्रस्त असून तो गोव्यावर लादला आहे. त्यात कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. सदर प्रकार हा अत्यंत चिंताजनक आहे. सनर्बन .सारख्या कार्यक्रमांना गोव्यात थारा दिला जावू नये असेही प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते विजय भिके यांनी स्पष्ट केली.
भिके म्हणाले, की सनबर्न महोत्सवात अमलीपदार्थांचा वापर होतो. अमलीपदार्थांच्या ओव्हरडोसमुळे काहींची तब्येक खालावून लोकांना तर काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सनबर्न महाेत्सव हा नेहमीच चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेत राहिला आहे. यावेळी देखील दोन मुलींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करावे लागले . तसेच त्याठिकाणी लोक मद्य प्राशन करतानाचे व्हिडिओ व्हायरला झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पहिल्याच दिवशी सनबर्नने ध्वनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.