गोवा विरोधी पक्षनेत्याने लोकायुक्तापासून संपत्ती लपविली - एसीबीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 12:50 PM2017-10-01T12:50:49+5:302017-10-01T12:51:08+5:30

गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांनी आपली संपत्ती गोवा लोकायुक्तापासून लपविली असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून करण्यात आला आहे.

Leader of Opposition in Goa has hidden wealth from Lokayukta - ACB claims | गोवा विरोधी पक्षनेत्याने लोकायुक्तापासून संपत्ती लपविली - एसीबीचा दावा

गोवा विरोधी पक्षनेत्याने लोकायुक्तापासून संपत्ती लपविली - एसीबीचा दावा

Next

पणजी - गोवा विधानसभेचे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांनी आपली संपत्ती गोवा लोकायुक्तापासून लपविली असल्याचा दावा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून करण्यात आला आहे. कवळेकर यांच्या विरोधात ४.७८ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका ठेऊन एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
२०१३- २०१५ या दरम्यान कवळेकर हे आमदार होते आणि या काळात लोकायुक्ताकडून सर्व आमदारांना आपल्या संपत्तीची माहिती देण्याचा आदेश दिला होता. कवळेकर यांनी आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र लोकायुक्ताकडे सादर केले होते, परंतु त्यात त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा समावेश नव्हता. त्यांच्या १४ भुखंडांच्या माहितीचा समावेश नव्हता. एसीबीच्या एका अधिकाºयाकडून ही माहिती देण्यात आली. 
एसीबीकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात बाबू यंच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सहसंशयित करण्यात आले आहे. कारण ज्या पाच व्यावसयिक संस्थांमधील मालमत्तेमळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व पाचही ंसंस्थांच्या सावित्री या संचालक आहेत. इलेकट्रॉनिक सिटी वेर्णा येथील सावित्री पेकेजीस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स वृशल हॉटेल एण्ड रेस्टॉरंट प्रा. ली,  मेसर्स वृशल इसेंट अ‍ॅण्ड , वृषल एन्टर प्रायझीस आणि दोनापावला येथील एम के एन्टरप्रायझेस या औद्योगिक अस्थापनांचा समावेश आहे. 
कवळेकर यांची एकूण बेहिशेबी मालमत्ता ही ४.७८ कोटी एवढी असल्याचे जरी अहवालात म्हटले असले तरी कवळेकर यांनी मुंबई येथील काही कंपनीकडून ५.५० कोटी रुपये कर्ज घेतल्याचे कवळेकर यांनी एसीबीला सांगिले आहे. या कर्जासंबंधी कोणतेही झालेले व्यवहार ते एसीबीला दाखवू शकले नाहीत.

Web Title: Leader of Opposition in Goa has hidden wealth from Lokayukta - ACB claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.