पणजी : दिग्गज राष्ट्रीय फुटबॉलपटू मेनिनो फिगरेदो यांचे निधन
By समीर नाईक | Published: April 8, 2023 07:07 PM2023-04-08T19:07:29+5:302023-04-08T19:07:43+5:30
गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे मेनिनो फिगरेदोच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
पणजी- गोव्याचे दिग्गज फुटबॉलपटू मेनिनो फिगरेदो (८६ वय)यांचे शनिवारी सकाळी करमणे- कुडतरी येथे त्यांच्या राहत्या घरात निधन झाले. गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे मेनिनो फिगरेदोच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
१९६४ मध्ये प्रथमच गोवा संघाने संतोष चषक स्पर्धेमध्ये भाग घेतला होत्या त्या संघाचे मेनिनो फिगरेदो यांनी कर्णधारपद भूषविले होते. गोव्याचे पहिले आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचा मानही मिळाला. १९६६ मध्ये मेनिनो यांनी फुटबॉलमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
मेनिनो फिगरेदो यांनीच गोव्याला भारतातील एक फुटबॉल शक्ती म्हणून ओळख करून दिली. मेनिनो हे पोर्तुगीज फुटबॉलपटूंसोबत देखील खेळले आहेत, आणि गोवा स्वतंत्र झाल्यावर त्यांनी सुरुवातीच्या काळात स्वतंत्र गोव्याचे प्रतिनिधित्व करत फुटबॉलमध्ये राज्याला वेगळी प्रतिमा तयार करण्यास मदत केली.
मेनिनो हा भारतासाठी खेळणारा पहिला गोमंतकीय हाेता. त्यांच्या अप्रतिम खेळामूळे त्यांना 'खांबो' असे टोपणनाव मिळाले होते. त्यांची फुटबॉलप्रती प्रेम आणि खेळाचे कौशल्य अनेकांना थक्क करायचे. मेनिनो यांच्या निधनामुळे फुटबॉल क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्यात २ मुले व १ मुलगी आहे.