Goa: लिंबू ७ रुपयांना एक तर शहाळे ५० रुपये, उकाड्यामुळे मागणी वाढली

By पूजा प्रभूगावकर | Published: February 25, 2024 01:53 PM2024-02-25T13:53:44+5:302024-02-25T13:54:51+5:30

Goa News: राज्यात उकाडा वाढू लागल्याने सध्या लिंबू तसेच शहाळ्यांना मागणी वाढली आहे. पणजी बाजारात एक लिंबू ७ रुपयांनी तर शहाळे ५० रुपयांना एक या दराने मिळत आहे.

Lemon at Rs 7 each and Shahale at Rs 50, demand increased due to heat | Goa: लिंबू ७ रुपयांना एक तर शहाळे ५० रुपये, उकाड्यामुळे मागणी वाढली

Goa: लिंबू ७ रुपयांना एक तर शहाळे ५० रुपये, उकाड्यामुळे मागणी वाढली

- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी- राज्यात उकाडा वाढू लागल्याने सध्या लिंबू तसेच शहाळ्यांना मागणी वाढली आहे. पणजी बाजारात एक लिंबू ७ रुपयांनी तर शहाळे ५० रुपयांना एक या दराने मिळत आहे.

उकाडा असाच कायम राहिला तर लिंबू आणखीन महाग होऊन तो १० रुपयांपर्यंत जाईल अशी शक्यता लिंबू विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी हेच लिंबू २० रुपयांना ५ ते ६ असे मिळायचे. पणजी बाजारात लिंबू हे कर्नाटक येथील बिजापूर येथून आयात केले जातात. मात्र तेथे अचानक पाऊस पडल्याने त्याची आवक घटली. त्यातच उकाडा वाढल्याने लिंबूंना मागणी वाढली. त्यामुळे लिंबू महागले आहेत.

उकाडयात लिंबू प्रमाणेच शहाळ्यांनाही मोठी मागणी असते. यापूर्वी ४० रुपयांना एक या दराने मिळणाऱ्या शहाळ्याच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या पणजी बाजारात शहाळे ५० रुपयांना मिळत आहे.

Web Title: Lemon at Rs 7 each and Shahale at Rs 50, demand increased due to heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा