लिंबू १० रुपये एक, तर कलिंगड २५ रुपये किलो : शहाळे झाले ५० रुपये

By पूजा प्रभूगावकर | Published: March 19, 2024 04:55 PM2024-03-19T16:55:17+5:302024-03-19T16:56:13+5:30

राज्यात उकाडा वाढू लागल्याने लिंबू, शहाळे व कलिंगडाचे दर भडकले आहेत.

lemon rs10 per kg watermelone rs 25 per kg and Shahale rs 50 per kg in summer seasone | लिंबू १० रुपये एक, तर कलिंगड २५ रुपये किलो : शहाळे झाले ५० रुपये

लिंबू १० रुपये एक, तर कलिंगड २५ रुपये किलो : शहाळे झाले ५० रुपये

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी : राज्यात उकाडा वाढू लागल्याने लिंबू, शहाळे व कलिंगडाचे दर भडकले आहेत. पणजी बाजारात सध्या लिंबू ५० रुपयांना ५ म्हणजेच १० रुपयांना एक या दराने मिळत आहे. यावरऊन फळांनाही आता उकाड्याची झळ बसू लागल्याचे दिसत आहे.

मध्यंतरी लिंबू ८ रुपयांना एक मिळत होता. मात्र उन्हाळा वाढल्याने व लिंबूंना मागणी वाढल्याने यात आणखीन २ रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना पाच तर लहान आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ असे मिळत आहेत. मे महिन्यापर्यंत उकाडा कायम राहिल्यास लिंबाचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे विक्रेते सांगत आहेत.

राज्यात साधारणत: मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने उकाड्याचे असतात. सध्या सरासरी कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सियस तर किमान तापमान २२.४ डिग्री सेल्सियस इतके नोंद होत आहे. त्यामुळे लिंबू सरबत, शहाळे, कलिंगड यांना लोकांकडून मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढले आहेत. पणजी बाजारात ४० रुपयांना एक या दराने मिळणारे शहाळे १० रुपयांनी महागले आहे. शहाळे ५० रुपये झाले आहे.

Web Title: lemon rs10 per kg watermelone rs 25 per kg and Shahale rs 50 per kg in summer seasone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.