आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊ: मुख्यमंत्री; अग्निशामक दलाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 12:42 PM2024-11-30T12:42:00+5:302024-11-30T12:42:17+5:30
अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'अग्निशामक दलाच्या मुख्यालयाची नविन इमारत आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनसुविधांयुक्त उभारली गेली आहे. त्यामुळे येथे आता आपत्ती व्यावस्थापनाचे डिप्लोमा किंवा लहान प्रशस्तीपत्रक अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत अग्निशामक दलाच्या संचालकांशीदेखील चर्चा झाली आहे. पुढील वर्षी जून महिन्यात अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार आहे. त्यातून रोजगार निर्मिती होईल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, साळगावचे आमदार तथा जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष केदार नाईक, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, माजी संचालक अशोक मेननर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये पदवीनंतर विषेश आपत्ती व्यावस्थापन अभ्यासक्रम सुरु केले आहे, पण अग्निशामक दल आणि आपत्ती व्यावस्थापन विभागाच्या मदतीने सरकारी स्तरावर अभ्यासक्रम सुरू करण्याचे आम्ही ठरविले आहे. सध्या काहींना प्रशिक्षणदेखिल देण्यात आले. मानवीन गोम्स या तरुणाने अग्नीसुरक्षा अॅपही तयार केले. अग्निशामक वाहन कुठे पोहचले, किती वेळात दुर्घटनेवर नियंत्रणात येईल, कुठली यंत्रणा वापरत आहे, याची माहीती मिळेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सुमारे ३५ कोटी रुपये खर्च करुन इमारत बांधली के आहे. यामध्ये पणजी कार्यालय, मुख्यालय आणि प्रशिक्षण केंद्रही आहे. वे देशात कुठल्याही राज्यातील प अग्निशामक दलाचे मुख्यालय एवढे सुसज्ज नाही. हे देशात प्रगत प्रशिक्षण केंद्र ठरेल.
सुरक्षा हेच कर्तव्य : रायकर
अग्निशामक दलाचे संचालक म्हणाले की, या विभागाकडून लोकांची, नैसर्गिक साधनसंपत्तीची सुरक्षा हे काम कर्तव्य म्हणून केले जाते. सरकारतर्फे आम्हाला याला नेमहीच मदत मिळते. आता साधनसुविधायुक्त इमारतीसह आधुनिक तंत्रज्ञान आमच्याकडे उपलब्ध आहे. यातून कामाला गती मिळेल.