गोव्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत लवकरच ‘लाय डिटेक्टर’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 01:14 PM2018-10-26T13:14:32+5:302018-10-26T13:14:43+5:30

गुन्हे वदवून घेण्यासाठी लवकरच लाय डिटेक्टर्स गोवा पोलिसांच्या सेवेत येणार आहेत.

'Lie Detector' in Goa's Forensic Laboratory | गोव्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत लवकरच ‘लाय डिटेक्टर’

गोव्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत लवकरच ‘लाय डिटेक्टर’

Next

पणजी : गुन्हे वदवून घेण्यासाठी लवकरच लाय डिटेक्टर्स गोवा पोलिसांच्या सेवेत येणार आहेत. वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेसाठी अद्ययावत उपकरणांसाठी पोलिस दलाने निविदा काढल्या आहेत.  सध्या हत्या, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत सत्य वदवून घेण्यासाठी लाय डिटेक्शन चाचणीसाठी संशयित गुन्हेगाराला मुंबई, हैदराबाद किंवा बंगळुरुला पाठवावे लागते. गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी अन्य राज्यांवर अवलंबून रहावे लागते. महिनोन्महिने अहवाल मिळत नाहीत त्यामुळे तपासकामांवरही परिणाम होतो. 

वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळा असून नसल्यासारखी स्थिती सध्या आहे. त्यामुळे कम्प्युटराइझ्ड पोलिग्राफी सिस्टम (लाय डिटेक्टर) वेर्णा येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत आणले जातील. डझनभराहून अधिक वेगवगळ्या अद्ययावत् उपकरणांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 

ड्रग्स तपासण्याचीही सोय होणार 

दरम्यान, अंमली पदार्थांची चाचणीही आता या प्रयोगशाळेत होणार आहे. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने ड्रग्सचा हब बनलला आहे. विदेशी पर्यटक अंमली पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे ड्रग्सचा छुपा व्यवहार मोठ्या प्रमाणात येथे चालतो. गांजा, चरस यासारखे ड्रग्स सापडले की ते तपासण्यासाठी सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवावे लागतात तर रासायनिक ड्रग्स चाचणीकरिता परराज्यात पाठवले जातात. हैदराबाद किंवा दिल्ली येथील केंद्रीय फॉरेन्सिक प्रयोगशाळांमध्ये बºयाचदा नमुने स्वीकारले जात नाहीत. गेल्या साताठ महिन्यांमध्ये रासायनिक ड्रग्सच्या सुमारे २२ प्रकरणांचा तपास रखडला आहे. 

अधिकृत माहितीनुसार गेल्या पर्यटक मोसमात मे महिन्यापर्यंत अंमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलिसांनी ८८ प्रकरणे नोंदविली. ३१ गोमंतकीय, १३ विदेशी तसेच वेगवेगळ्या राज्यातील ४९ भारतीयांना या प्रकरणांमध्ये अटक झाली. गांजा, चरस, एमडीएमए, एलएसडी, एक्सटसी, कोकेन, हेरॉइन आदी ड्रग्स या कारवाईत जप्त करण्यात आले. 

Web Title: 'Lie Detector' in Goa's Forensic Laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस