गोव्यातील वेळसांव खून प्रकरणातील दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By सूरज.नाईकपवार | Published: April 5, 2024 05:00 PM2024-04-05T17:00:51+5:302024-04-05T17:01:49+5:30

२ एप्रिल २०२१ रोजी खुनाची ही घटना घडली हाेती.

life imprisonment for two accused in the murder case in goa | गोव्यातील वेळसांव खून प्रकरणातील दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

गोव्यातील वेळसांव खून प्रकरणातील दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सूरज नाईकपवार ,मडगाव :  गोव्यातील दक्षिण गोव्यातील वेळसाव येथे सन्नी सिंग या इसमाच्या खूनप्रकरणातील दोषी ठरलेल्या दिनेश कुमार (उत्तर प्रदेश) व शिवनाथ माजी (ओडिशा) या दाेघांना काल शुक्रवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजारांचा दंडही सुनावला.

येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष क्षमा जोशी यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. २ एप्रिल २०२१ रोजी खुनाची वरील घटना घडली हाेती. मयत सन्नी हा ट्रॉलरवर कामाला होता. दारुच्या नशेत खुनाची वरील घटना घडली होती. संशयितांनी मयताच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला होता. त्यात त्याला मरण आले होते. नंतर वेर्णा पोलिसांनी या खूनप्रकरणाचा तपास करुन संशयितांना अटक केली होती. संशयितांवर भादंसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. सरकारपक्षातर्फे वकील गोविंद गावकर यांनी युक्तीवाद केला.

Web Title: life imprisonment for two accused in the murder case in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.