'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये', मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
By किशोर कुबल | Published: July 12, 2023 02:41 PM2023-07-12T14:41:53+5:302023-07-12T14:44:03+5:30
Goa: गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- किशोर कुबल
पणजी - गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ‘लोकांनी धबधब्यांवर पाण्यात उतरण्याचे नको ते धाडस करुन जीव धोक्यात घालू नये, असे सावंत यांनी केले असून यापुढे प्रत्येक धबधब्यावर दृष्टी लाइफ सेव्हिंगचे जीवरक्षक तैनात केले जातील, असे स्पष्ट केले.
सावंत म्हणाले कि, पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही अनेकजण मद्यपान करुन पाण्यात उतरतात आणि बुडून मरण पावतात. गेल्या एक ते दीड महिन्यात नद्या, किनारे, धबधबे, चिरखाणी व अन्य ठिकाणी मिळून राज्यात १५ ते २० जण बुडून मरण पावले आहेत. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहेच परंतु लोकांनीही अतिधाडस करुन पाण्यात उतरु नये.’