मडगावात गस्तीवरील पोलिसांना सापडलेल्या बॅगेत बाटल्या; ८ हजार रूपयांची दारु जप्त
By सूरज.नाईकपवार | Updated: March 29, 2024 11:23 IST2024-03-29T11:23:11+5:302024-03-29T11:23:32+5:30
स्टेशन रोड येथे एका हॉटेलसमोर त्यांना एक बॅग आढळून आली

मडगावात गस्तीवरील पोलिसांना सापडलेल्या बॅगेत बाटल्या; ८ हजार रूपयांची दारु जप्त
सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यातील मडगावात गस्तीवरील पोलिसांना एका बॅगेत ठेवलेल्या दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यात एकूण ८ हजार ९८६ रुपयांची दारु होती. पोलिसांनी ती जप्त केली आहे. ती बॅग कुणी सोडून दिली होती याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
हवालदार गोरखनाथ गावस व पोलिस शिपाई सुभानी शेख हे गस्तीवर हाेती. येथील स्टेशन रोड येथे एका हॉटेलसमोर त्यांना एक बॅग आढळून आली. तेथे कुणीही नव्हते. पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली असता, आता दारुच्या बाटल्या सापडल्या. यात रॉयल व्हिस्कीच्या २१, रॉयल क्लास्सीकोच्या ११५ बाटल्या, ॲपल व्होडकाच्या १६ बाटल्या व अन्य दारुच्या बाटल्या सापडल्या. नंतर त्या जप्त करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.